सातारा

ठाकरे सरकारच्या दडपशाहीचा निषेध, चंद्रकांतदादांचा सेनेवर जोरदार निशाणा

उमेश बांबरे

सातारा : मंदिरासाठी संत महंतांनी आंदोलन केले की अटक करून कलमे लावली जातात. शेतकऱ्यांनी झुणका भाकर आंदोलनास परवानगी मागितली तर नाकारण्यात आली. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. 

साता-यात आज भाजप पदवीधर उमेदवार मेळावा पार पडला. यावेळी पत्रकार परिषदेत चंद्रकात पाटील यांना किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत भाष्य केले. किरीट सोमय्यांना आरोप करण्याचे अधिकार या लोकशाहीत आहेत त्यांनी ते खोडावेत. तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही खोडावेत, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिले. रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील जमीन व्यवहार प्रकरण हे जाणीवपूर्वक समोर ठेऊन अर्णव गोस्वामी प्रकरणावरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जातोय का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, "किरीट सोमय्या यांनी ठोस कागदपत्रे बाहेर काढली आहेत. ती खोटी वाटत असतील तर शिवसेनेने न्यायालयात जावे,"

अन्वय नाईक व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील जमीन व्यवहाराबाबत भाजपच्या नेत्यांनी निशाणा साधला आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात 'सामना' रंगला आहे. "मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आरोपांचे उत्तर द्यावे," असे आव्हान किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे. त्यावरुन शिवसेना नेते किरीट सोमय्यांना लक्ष्य बनवत आहेत. आज साताऱ्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सोमय्यांची पाठराखण केली.

या महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का? असा सवाल त्यांनी केला. आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायला मिळणार की नाही, असे विचारत ते म्हणाले, "मंदिरासाठी संत महंतांनी आंदोलन केले की अटक करून कलमे लावली जातात. शेतकऱ्यांनी झुणका भाकर आंदोलनास परवानगी मागितली तर नाकारण्यात आली. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. गेल्या ११ महिन्यांपासून या सरकारचा जो हैदोस चालू आहे तो सर्वसामान्य जनता पाहत असल्याचा टोलाही त्यांनी ठाकरे सरकारला लगावला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

MNGL Fraud : एमएनजीएल गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने महिला वकिलाची ४.९८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Latest Marathi News Live Update : जोपर्यंत मी राहील तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील- वाजे

MNGL Fraud : एमएनजीएलच्या नावाने व्हॉट्सॲप एपीके फाईल; १३ रुपयांच्या बहाण्याने क्रेडिट कार्डवरून ३.६४ लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT