सातारा

'नव्याने कोणी ओबीसीतून आरक्षण मागत असेल, तर त्याला आमचा विरोध राहील'

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : ओबीसी समाजाला मंडल आयोगामुळे मिळालेले 27 टक्के आरक्षण वाचविण्यासाठी व त्याचे संरक्षण करण्यासाठी ओबीसी समाज बांधवांचा लढा अधिक तीव्र करणार असल्याचा निर्धार ओबीसी जनमोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आला. 

येथील डॉ. विजयराव बोरावके पतसंस्थेच्या सभागृहांमध्ये झालेल्या ओबीसी जनमोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीत निर्धार करण्यात आला. ओबीसी समाज मुळातच राजकीय, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या आजही मागासलेला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या समाजाला देशाच्या समाजकारणात व राजकारणात संधी मिळालेली नाही. नव्याने कोणी जर ओबीसीमधून आरक्षण मागणार असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध राहील. कसल्याही परिस्थितीमध्ये मराठा ओबीसीकरण होऊ देणार नाही. यासाठी राज्यातीलच नव्हे, तर देशातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद सर्वच राज्यकर्त्यांनी घ्यावी. तसेच भविष्यात ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून फलटण तालुक्‍यासह जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधवांचे संघटन मजबूत करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी रस्त्यावरील लढाईला सुद्धा आता ओबीसी समाज तयार झालेला आहे. मंडल आयोगाअंतर्गत ओबीसी समाजाला मिळालेल्या सर्व सोयीसुविधा सरकारने तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, तसेच ओबीसी समाजाची जनगणना कसल्याही परिस्थितीत ताबडतोब करावी आदी मागण्यांचा ऊहापोह बैठकीमध्ये करण्यात आला. मागण्यांकडे दुर्लक्ष कराल तर गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल, अशी मते विविध मान्यवरांनी व्यक्त केली. 

या वेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. विजयराव बोरावके, श्रीराम कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी सभापती शंकरराव माडकर, दादासाहेब चोरमले, बजरंग गावडे, मिलिंद नेवसे, दशरथ फुले, प्रतिक क्षीरसागर, राजेंद्र नेवसे, अजय माळवे, सुभाष भांबुरे, नासिर शिकलगार, पिंटू इवरे, बाळासाहेब ननावरे, रघुनाथ कुंभार, अमोल कुमठेकर, बापूराव काशीद, परशुराम फरांदे आदींनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सहदेव शेंडे, दत्तात्रय बरळ, किशोर तारळकर, रहीम तांबोळी, डी. वाय. शिंदे, प्रवीण नाळे, नितीन नेवसे ,अनिल शिंदे, प्रवीण उंडाळे, सुनील भुजबळ, राजेंद्र भागवत, राजेश बोराटे, ज्ञानदेव झगडे आदी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

"हम मजदूर आदमी हैं", मोहम्मद शमीने पुन्हा निवड समिती प्रमुख अजित आगरकरला टोमणा हाणला, आता हा वाद आणखी पेटणार?

Paithan Pachod Education News: पाचोडच्या शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

Latest Marathi News Live Update: पुण्याच्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात

'आता एवढंच राहिलं होतं!' कॉमेडियन समय रैनानं उडवडी बिग बी अमिताभ बच्चन यांची खिल्ली, म्हणाला...'पोलिओच्या जाहिराती केल्या पण...'

SCROLL FOR NEXT