सातारा

महाराज, टेक केअर.. काळजी घ्या! रामराजेंचा उदयनराजेंना सल्ला

उमेश बांबरे

सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू आहे. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केला. पण, उदयनराजेंच्या स्वभावामुळे यात यश आले नाही. त्यानंतर दोघांत लोकसभा निवडणूक होईपर्यंत वाद सुरू होता. मात्र, सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील गेल्या काही वर्षांच्या वादाला आज पूर्ण विराम मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले. 

आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास खासदार उदयनराजे शासकीय विश्रामगृहात रामराजे बसलेल्या एक नंबरच्या सुटमध्ये गेले. दोघांनीही राजघराण्याचा शिष्टाचार पाळत एकमेकांचे स्वागत केले. दोघांत तीन चार मिनिटे दिलखुलास चर्चा झाली. त्यानंतर पुण्याला जायचे म्हणून रामराजे निघाले. कोरोना असल्याने जाताना उदयनराजेंनी रामराजेंना टेक केअर, लवकरच भेटू असे म्हणाले, तर रामराजेंनीही उदयनराजेंना टेक केअर.. काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

सभापती रामराजे व खासदार उदयनराजे या दोघांत लोकसभा निवडणूक होईपर्यंत वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला होता. उदयनराजेंनी एकेदिवशी फलटणला जाऊन तेथील शासकीय विश्रामगृहात जाऊन रामराजेंना चॅलेंज केले होते. त्यानंतर हा वाद संपूर्ण निवडणुकीत पहायला मिळाला. निवडणुकीनंतर वाद पुन्हा बाजूला पडला. पण, आज सातारच्या शासकीय विश्रामगृहात गेल्यावर्षी जूनमध्ये घडला तसाच प्रकार घडला. जिल्हा बॅंकेची सभा उरकून रामराजे नाईक निंबाळकर शासकीय विश्रामगृहात थांबले होते. त्यांच्याकडे कामानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व इतर काहीजण थांबलेले होते. सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान, शासकीय विश्रामगृहात अचानक खासदार उदयनराजे भोसले यांचे आगमन झाले. पोर्चमध्ये येताच त्यांनी कोण थांबलंय असे विचारले. त्यावेळी रामराजे साहेब असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उदयनराजे गाडीतून उतरले व थेट रामराजे बसलेल्या एक नंबरच्या सुटमध्ये गेले. त्यामुळे शासकीय विश्रामगृहात उपस्थित आवक्‌ झाले. त्यांना काय होणार हे समजायच्या आत उदयनराजे रामराजे बसलेल्या सुटमध्ये पोहोचले व उभे राहिले. 

उदयनराजेंना पाहून रामराजेंनी या महाराज असे म्हणून राजघराण्याचा शिष्टाचार पाळत दोघांनीही एकमेकांचे स्वागत केले. त्यानंतर दोघांनीही एकमेकांकडे हसत पाहिले व उदयनराजे कोचवर बसले. तोपर्यंत इतर कायकर्ते सुटमधून बाहेर निघून गेले. सुमारे तीन मिनिटे दोघांनी चर्चा केली. तोपर्यंत बाहेर उपस्थित असलेल्यांना काय होतंय काय नाही, या विचाराने अस्वस्थ केले होते. दोन्ही राजांनी अल्पवेळ चर्चा केल्यानंतर रामराजेंनी आम्हाला पुण्याला जायचे आहे. असे म्हणत निघुया म्हणाले. त्यानंतर दोन्ही राजांनी एकमेकांचा निरोप घेतला. जाताना उदयनराजेंनी रामराजेंना टेक केअर...लवकरच भेटू असे म्हणताच रामराजेंनी ही टेक केअर तुम्हीही काळजी घ्या..असे म्हणत विश्रामगृहातून दोघेही बाहेर आले. त्यानंतर रामराजे गाडीतून पुण्याकडे रवाना झाले, तर उदयनराजे जलमंदिर पॅलेसकडे रवाना झाले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT