सातारा

साताऱ्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : ग्रेड सेपरेटरमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संरक्षक भिंतीलगत उपलब्ध झालेल्या पोवई नाक्‍याकडील कोपऱ्यावरील त्रिकोणी जागेवर महात्मा गांधी यांचे शिल्प ट्रॅफिक आयलंड उभारावे, तसेच हुतात्मा स्मारक ते खिंडवाडी या महामार्गाचे महात्मा गांधी मार्ग असे नामकरण करावे, अशी मागणी येथील महात्मा गांधी स्मारक समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

याबाबतची माहिती समितीचे अस्लम तडसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. ग्रेड सेपरेटरचे काम सध्या पोवई नाक्‍यावर सुरू आहे. तेथे शिवाजी सर्कल परिसरात सार्वजनिक बांधकाम इमारतीच्या पश्‍चिम बाजूस त्रिकोणी आकाराची जागा झाली आहे. शिवाजी सर्कल परिसराच्या सुशोभीकरणाने साताऱ्याच्या वैभवात भर पडणार आहे. या त्रिकोणी आकाराच्या जागेत ट्रॅफिक आयलंड महात्मा गांधी शिल्प उभारण्यात यावे, असे महात्मा गांधी स्मारक समितीने निवेदनात म्हटले आहे. 

शांती, समता, एकात्मतेचा संदेश देणारे हे महात्मा गांधी शिल्प ट्रॅफिक आयलंड प्रधानमंत्री निर्देशित महात्मा गांधी यांची 150 वी जयंती संकल्पित कार्यक्रमाचाच एक भाग आहे. ट्रॅफिक आयलंड प्रकल्प, सुशोभीकरण प्रकल्प आणि हुतात्मा स्मारक ते खिंडवाडी या रस्त्यास महात्मा गांधी महामार्ग असे नामकरण करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद द्यावा व या बाबतीची तातडीने कार्यवाही करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. महात्मा गांधी स्मारक समितीने या बाबतचे निवेदन नुकतेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही दिले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT