Heavy Rain esakal
सातारा

पुणे, सातारा, रत्नागिरीसह 'या' भागात जोरदार पाऊस; 'हवामान'चा अंदाज

बाळकृष्ण मधाळे

सातारा : राज्यात माॅन्सून (rain monsoon) पावसाचे (Heavy Rain) जोरदार आगमन झाले असून राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र, मागील तीन-चार दिवसांपासून उसंत घेतलेला पाऊस येत्या तीन तासात पुणे, सातारा, रत्नागिरी, दापोलीसह धरणक्षेत्रात (Dam area) पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचेही हवामानने स्पष्ट केले आहे. (Meteorological Department Has Forecast Heavy Rain In Pune Satara Ratnagiri And Dapoli In The Next Three Hours)

राज्यात माॅन्सून पावसाचे जोरदार आगमन झाले असून राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.

राज्यात पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना (farmer) थोडा दिलासा मिळाला असून काही भागात शेतकऱ्यांनी पावसाच्या जोरावर पेरणी उरकून घेतली आहे. मात्र, मराठवाडा, विदर्भात अद्याप पावसाचा जोर कमीच असल्याचे दिसत असून तेथील पेरणी लांबली आहे. सध्या पावसाने चांगलीच उसंत दिली आहे, तर काही ठिकाणी तुरळक, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. त्यामुळे नद्यांतील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. तर वाढलेल्या पाणीपातळीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

आज राज्यातील पुणे, सातारा, रत्नागिरी, दापोलीसह धरणक्षेत्रात पावसाची जोरदार अतिवृष्टी होणार असून पिकांचे काही प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज हवामानने व्यक्त केला असून शेतकऱ्यांनाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील तापमानात परत एकदा वाढ होताना दिसत असून आयएमडीने (IMD) पूर्वानुमान दिल्याप्रमाणे राज्यात येत्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन आयएमडी व कृषी विभागाकडून (Department of Agriculture) करण्यात आले आहे.

Meteorological Department Has Forecast Heavy Rain In Pune Satara Ratnagiri And Dapoli In The Next Three Hours

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

Sambhajinagar Students Crisis: गॅसअभावी ‘सिपेट’ची मेस बंद; उपाशीपोटी विद्यार्थ्यांनी धरली घरची वाट; ताटात खिचडी, जेवणात अळ्या

Beed Crime: लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीची विक्री अन् अमानवी अत्याचार, थरारक घटनेने बीड हादरले!

शेततळी बनली मृत्यूचे सापळे! मुलांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी; पालकांनी घ्यावी मुलांची काळजी, शेतकऱ्यांना आता शेततळ्याला कुंपण करण्याचे बंधन

इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश! ‘आरटीई’ प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत करता येणार अर्ज, पालकांना घरापासून 5KM अंतरातील निवडता येणार शाळा

SCROLL FOR NEXT