सातारा

म्हसवड : उद्यापासून तीन दिवस जमावबंदी; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार

सलाउद्दीन चाेपदार

म्हसवड (जि. सातारा) :  येथील श्री सिद्धनाथ-जोगेश्वरी देवस्थानची मंगळवारी (ता. 15) देवदिवाळीस होणारी रथयात्रा कोरोनाच्या साथीमुळे प्रशासनाने रद्द केली असून यात्रा कालावधीत ता. 14 ते 16 डिसेंबरअखेर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे म्हसवड शहरातील प्रमुख रस्ते व यात्रा मैदानात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पोलिस व राज्य राखीव पोलिस दलासह गृहरक्षक दलाचे संचलन करण्यात आले.
 
प्रत्येक वर्षी परंपरागत देवदिवाळीस श्री सिद्धनाथ-जोगेश्वरी देवस्थानच्या उत्सव मूर्तींची रथातून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढली जाते. या रथोत्सव मिरवणुकीस राज्यातील व परराज्यातील सुमारे पाच ते सहा लाख भाविकांची उपस्थिती असते. सध्या संपूर्ण जगासह भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. यात्रा कालावधीत म्हसवड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्र येण्याची शक्‍यता आहे. त्यातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्‍यता असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली. संपूर्ण म्हसवड शहरात तीन दिवस जमावबंदी व संचारबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.

लवकरच महावितरण कार्यालयास टाळे ठोकणार; अशाेक गायकवाडांचा इशारा

या आदेशानुसार पोलिसांनी म्हसवड शहरात संचलन केले. यात्रा मैदान, म्हसवड शहरास जोडले गेलेले सर्व रस्ते सील करून वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. यात्रा मैदानानजीकहून ये-जा करणारी सर्व वाहनांची वाहतूक मंगळवारी बंद केली जाणार आहे. सर्व वाहने हिंगणी, राजेवाडीमार्गे दिघंची, आटपाडीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाने जातील. दिघंची, वरकुटे-मलवडी येथून म्हसवडमार्गे होणारी वाहतूक म्हसवड येथील मेगा सिटीनजीकच्या रस्त्यावरून मसाई बोनेवाडीमार्गे सातारा रस्त्यावरून पुढे दहिवडी, सातारा, फलटणकडे जाण्याची पर्यायी सुविधा केली असल्याचे म्हसवड पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : अपक्षांचा खेळ उधळणार? कागल निवडणुकीत मतांसाठी गट-तटांची धडपड आणि राजकीय रणनीतीने तापला माहोल

Latest Marathi News Live Update : नवले पूल अपघातानंतर वाहतूक विभागाचा मोठा निर्णय

Video: भिंत पाडण्यासाठी आमदार स्वतः चढले जेसीबीवर; दिलीप लांडेंचा व्हिडीओ व्हायरल

Kalamnuri Nagar Parishad Election : मतांसाठी आता लक्ष जातीवर; उमेदवारांकडून अखेरचे डावपेच, प्रचारासाठी तीनच दिवस

Honour Killing : प्रेयसीनं घरी बोलावलं अन् तिच्या कुटुंबीयांनी प्रियकराचे हात-पाय बांधून गोळ्या झाडून केली निर्दयीपणे हत्या

SCROLL FOR NEXT