satara  sakal
सातारा

सैन्य भरतीसाठी साताऱ्यात आंदोलन

आंदोलनस्थळी तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

प्रशांत घाडगे

सातारा : कोरोना काळात गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरती स्थगित आहे. त्यामुळे उमेदवारांच्या वयोमर्यादेत दोन वर्ष वाढ करून सवलत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी कॉम्रेड्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देऊन तरुणांच्या मागण्या ऐकून घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याशी चर्चा केली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष जयवंत आरळे, सचिव अमोल साठे, बसित चौधरी, रणजित भिसे आदी उपस्थित होते.

आंदोलनस्थळी तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘सैन्य भरती आमचा हक्क,’ ‘सैन्य भरती नाही मतदान नाही, अशा प्रकारचे फलक तरुणांनी हातात घेऊन घोषणाबाजी केली. कोरोनामुळे गेले दोन वर्षे सैन्य दलाची भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचा अपेक्षा भंग झाला आहे. होतकरू तरुण हे अहोरात्र शारीरिक व बौद्धिक मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. मात्र, देशाची सेवा करण्याची इच्छा असूनही वयोमर्यादेच्या अटीमुळे तरुणांना भरती होता येत नाही. त्यामुळे कोरोनाच्या काळात भरती न झाल्यामुळे दोन वर्ष वाढवावीत, पुढील महिनाभरात खुल्या वर्गातील सैन्य भरती सुरू करावी, राज्य सरकार व केंद्र सरकारने समन्वय ठेऊन भरतीबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, या मागण्या निवेदनाद्वारे संघटनेने केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT