सातारा

महामार्ग, सेवा रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा : पालकमंत्री पाटील

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : शेंद्रे ते कागल रस्त्यादरम्यान नागठाणे, माजगाव फाटा, इंदोली जंक्‍शन, मसूर फाटा, वाघवाडी फाटा येथे उड्डाणपूल होणे आवश्‍यक आहे. त्या कामांबरोबरच पंकज हॉटेल ते दुर्गा हॉटेल या लांबीत पारदर्शी उड्डाणपूल करा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. पाचवड फाटा, नारायणवाडी, आटके टप्पा येथील सेवा रस्त्यावरील तर कृष्णा कॅनॉल ते ओगलेवाडी दरम्यानच्या रस्त्यावरील साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा, अशाही सूचना त्यांनी केल्या. 

मंत्री पाटील यांनी येथील शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी नगरसेवक गंगाधर जाधव, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, महामार्ग प्राधिकरणाचे संचालक व्ही. डी. पंदारकर, उपअभियंता व्ही. एन. पाटील, वैभव एन. पाटील, निखिल पानसरे, एस. बी. डोंगरे, सल्लागार अभिजित यादव, बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. जी. जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, प्रशांत यादव, सर्जेराव पानवळ आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, "शेंद्रे ते कागल रस्त्याच्या लांबीमध्ये नागठाणे, माजगाव फाटा, इंदोली जंक्‍शन, मसूर फाटा, वाघवाडी फाटा येथे दळणवळणाच्या दृष्टीने पारदर्शी उड्डाणपूल, पंकज हॉटेल ते दुर्गा हॉटेल या लांबीत पारदर्शी उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. पाचवड फाटा व नारायणवाडी, आटके टप्पा या ठिकाणच्या सेवा रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात.'' कृष्णा कॅनॉल ते ओगलेवाडीपर्यंतच्या रस्त्यावर पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे वाहनधारक, तेथील नागरिक यांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचा विचार करून तातडीने तो प्रश्न मार्गी लावावा, अशाही सूचना त्यांनी केल्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Retirement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार? उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव चर्चेत?

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

SCROLL FOR NEXT