निवेदन  sakal
सातारा

मंत्री नवाब मालिकांना बडतर्फ करा; भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे

- उमेश बांबरे

सातारा: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी सातारा शहर आणि तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना दिले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आल्या आहेत.

भाजपच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले, की कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्ब स्फोटातील गुन्हेगारांशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना तीन मार्चपर्यंत कोठडी दिली आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहेत. राज्यासह देशातील सर्व नागरिकांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा होईपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शने केली जातील. याचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अन्यथा जनसामान्यांच्या होणाऱ्या उद्रेकास राज्य शासन जबाबदार राहील.satara

या वेळी भाजप सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, शहर सरचिटणीस जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नीलेश नलावडे, शहराध्यक्ष विक्रम बोराटे, महिला मोर्चा शहराध्यक्ष रिना भणगे, ओबीसी मोर्चा युवती जिल्हाध्यक्ष वनिता पवार, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रम पवार, स्वप्नील बोराटे, विजय गाढवे, विक्रम अवघडे, तेजस काकडे, हेमंत शिंदे, अविनाश खार्शिकर, ॲड. सचिन तिरोडकर, आशुतोष चौधरी, स्वप्नील लोखंडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT