satara sakal
सातारा

राष्ट्रवादीकडुन विचारणा झाल्यास विचार करु : गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भात सेनेची बैठक

- हेमंत पवार

कऱ्हाड : सातारा (Satara) जिल्हा बॅंकेच्या (Bank) निवडणुकीबाबत (Election) आमची शिवसेनेची (Shivsena) बैठक होणार आहे. आमदार (MLA) महेश शिंदे (Mahesh Shinde) व पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक होईल. बैठकीत शिवसेनेची (Shivsena) काय भुमिका घ्यायची, कोणते उमेदवार ठरवायचे, किती जागा लढवायच्या हे निश्चित केले जाईल. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन (NCP) जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणुन जर विचारणा झाली तर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्याशी चर्चा करुन आमच्या जागा आम्ही ठरवुन त्यांच्या पक्षाच्या जागा ते ठरवतील, असे मत गृहराजयमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज व्यक्त केले.

सातारा जिल्हा बॅंके च्या निवडणुकीसंदर्भात कऱ्हाडमधील कार्यक्रमानंतर जिल्हा बॅंकेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत शिवसेनेची बैठक होणार आहे. आमदार महेश शिंदे व पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये शिवसेनेची काय भुमिका घ्यायची, कोणते उमेदवार ठरवायचे, किती जागा लढवायच्या हे निश्चित केले जाईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामाध्यमातुन जिल्हा बॅकेची निवडणुक लढवली गेली तर आम्हीही साथ देवु. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणुन जर विचारणा झाली तर आम्ही चर्चा करु. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हण यांच्याशी चर्चा करुन कॉंग्रेसच्या जागा ते तर शिवसेनेच्या जागा आम्ही ठरवु, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राडाप्रकरणी पोलिसांची पाठऱाखण

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे वक्तव्य जबाबदार होते . कोणत्याही पोलिसांनी चुकीचे, बेकायदेशीर काम केलेले नाही. तीन-चार ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या. गुन्हे दाखल झाले. त्या कलमात ज्या तरतुदी आहेत त्याला अनुसरुनच पोलिसांनी काम केले आहे. कोणतेही बेकायदेशीर कृत्य पोलिसांनी केलेले नाही, अशी पाठऱाखण त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

Sangli Property Tax: घरपट्टीबाबत आज समितीची बैठकतालीम, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, रेडीरेकनरवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT