सातारा

Video : सातारा सांगलीच्या हद्दीवरील चेकपोस्टची 'या' मंत्र्यांकडून अचानक पाहणी

हेमंत पवार

कऱ्हाड ः सहकार व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतीच सातारा-सांगली जिल्ह्यांच्या हद्दीवरील मालखेड (ता.कऱ्हाड) येथील चेकपोस्टसह शहरातील लॉकडाउनच्या स्थितीची संयुक्त पाहणी केली.
तुम्ही सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड प्रवास करीत असाल तर हे वाचा
 
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारपासून 26 जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यास शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. त्याची संयुक्त पाहणी पालकमंत्री पाटील व गृहराज्यमंत्री देसाई यांनी केली. त्यांनी पहिल्यांदा सातारा-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवरील मालखेड येथील चेकपोस्टची पाहणी केली. तेथील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी चर्चा करून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी शहरातील कोल्हापूर नाका, भेदा चौक, कृष्णा कॅनॉल, विद्यानगर येथील सिल्व्हर ओक कॉलनी, मंगळवार पेठ, चावडी चौक व दत्त चौक येथील लॉकडाउनची पाहणी केली. प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, कऱ्हाड शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ आदी उपस्थित होते.

साप- घुशींनी उडवली त्यांची झोप

Video : सेनेच्या मंत्र्याचा माेदी सरकारवर आराेप; सापत्न वागणूक 

मंत्री देसाईंनी केले सारथ्य 

पालकमंत्री पाटील व गृहराज्यमंत्री देसाई यांनी कऱ्हाडच्या परिसराची पाहणी केली. येथील शासकीय विश्रामगृहातून त्यास प्रारंभ झाला. त्यावेळी मंत्री देसाई यांनी त्यांच्या स्वतःच्या गाडीतून पालकमंत्र्यांना पाहणी करूया, असे सांगून स्वतःच गाडीचे सारथ्य केले. दौरा पूर्ण होईपर्यंत मंत्री देसाई यांनीच गाडीचे सारथ्य केले, त्याची चर्चा सुरू होती. 
संपादन : सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासल्या नाहीत तर Claimच्या वेळी बसू शकतो मोठा धक्का!

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर कर्जतला पहाटे दाट धुक्याची चादर; आल्हाददायक वातावरणाने नागरिक सुखावले

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT