Shambhuraj Desai esakal
सातारा

शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची विश्रामगृहात खलबत्ते

उमेश बांबरे

सातारा : शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक (Satara Bank Election) लढवली जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी कामाला लागावे, अशी सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी केली. दरम्यान, काँग्रेससह (Congress) इतर समविचारी लोकांची भूमिका लक्षात घेऊन शिवसेनेचे नेते आगामी रणनीती ठरविणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून (NCP) शिवसेनेच्या या निर्णयाकडे कसे बघितले जाणार याची उत्सुकता आहे.

सद्यःस्थितीत काँग्रेस पक्षाची भूमिका लक्षात घेऊन शिवसेनेचे नेते आपली आगामी रणनीती ठरवणार आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक नुकतीच गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात झाली. या वेळी शिवसेनेचे उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील (Nitin Banugade-Patil), आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde), धैर्यशील कदम, शेखर गोरे, डी. एम. बावळेकर आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठकीत चर्चा झाली. यामध्ये बँकेच्या मतदारसंघनिहाय चर्चा करून संपूर्ण आढावा घेण्यात आला. या बँकेची कच्ची मतदार यादी येत्या शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघ, उमेदवार यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. बँकेच्या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शिवसेनेच्या इच्छुक नेत्यांनी कामाला लागावे, अशी सूचना या वेळी गृह राज्यमंत्री देसाई यांनी केली.

सद्यःस्थितीत काँग्रेस व इतर समविचारी पक्षांच्या लोकांची भूमिका लक्षात घेऊन शिवसेनेचे नेते आपली आगामी रणनीती ठरवणार आहेत. लवकरच निवडणुकीचा ठोस आराखडा तयार करून मुंबईमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक आयोजिली जाणार आहे. या बैठकीतून पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाची जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिका व किती जागा लढवणार संदर्भातील घोषणा केली जाणार आहे. शिवसेनेने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय भूमिका घेणार हा प्रश्न आहे. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून शिवसेनेला विचारात घेतले नाही, तर शिवसेना काँग्रेससोबत इतर समविचारी पक्षांना एकत्र करून जिल्हा बँकेत पॅनेल टाकण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT