सातारा

अधिवेशनात शक्ती कायदा मांडणार : गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : महिलांवरील अत्याचाराविरोधात राज्य शासन शक्ती हा नवीन कायदा आणत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो मंजूर करण्यात आला असून, येत्या अधिवेशनात तो मंजुरीसाठी मांडण्यात येईल. त्यामध्ये महिलांच्या दृष्टीने आवश्‍यक त्या सुरक्षेच्या अनुषंगाने तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांवरील अत्याचार निश्‍चितच थांबतील, अशी माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतीच दिली. 

ते म्हणाले, ""महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकार शक्ती हा नवीन कायदा आणत आहे. त्यामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांसाठी हा कायदा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्यावरील लैंगिक अत्याचारासाठी तातडीने प्रकरणे निकालात काढण्याचा समावेश आहे. अपिलाचा कालावधी सहा महिन्यांवरून 45 दिवसांवर आणण्यात आला आहे. त्यासाठी राज्यात स्वतंत्र महिला विशेष न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वतंत्र तपास यंत्रणाही राबवण्यात येईल. त्या नवीन महिला न्यायालयासाठी स्वतंत्र विशेष सरकारी वकिलांचीही नियुक्ती करण्यात येणार आहेत. राज्य शासन आणत असलेल्या या कायद्यामुळे निश्‍चित महिलांवरील अत्याचार थांबतील. शक्ती कायदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असून, येत्या अधिवेशनात तो मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येईल.'' 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना प्रकल्पाची, धरणाची, पोफळीतील वीज निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी पर्यटन विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर कोयना प्रकल्पातील मशिनरीसह अन्य बदलासाठीही त्यांचा ग्रीन सिग्नल आहे. त्याच्या कार्यवाहीसाठी अधिवेशनानंतर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत निर्णय होईल, अशीही माहिती गृह राज्यमंत्री देसाई यांनी दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

Ashok Kharat भोंदुगिरीतून जमवली ५०० कोटींची मालमत्ता, नाशिकमध्ये ७० एकर जमीन; नातलगांच्या नावावरही संपत्ती

अफगाणिस्तानच्या जखमेवर भारताची फुंकर, पाकच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाठवली मदत

Sangli Politics Clash : 'पळवापळवीचे परिणाम जयंत पाटील, विशाल पाटलांना भोगावे लागतील'; चंद्रकांतदादांचा थेट इशारा, सांगलीतलं राजकारण तापणार!

MSRTC News: तोट्यातील एसटीला दिलासा; डिझेल खरेदीतून २४१ कोटींची बचत

SCROLL FOR NEXT