Minister Shambhuraj Desai esakal
सातारा

अतिवृष्टीचे पंचनामे तीन दिवसांत करा; गृहराज्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील डोंगरी भागातील गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या पावसात अनेक घरांची पडझड व शेतीच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या नुकसानीचे येत्या तीन दिवसांत पंचनामे करून संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करा, अशा सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी प्रशासनाला केल्या आहेत. (Minister Shambhuraj Desai Orders The Government To Conduct An Inquiry Into The Excess Rain Within Three Days)

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील डोंगरी भागातील गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध गावांची पाहणी गृह राज्यमंत्री देसाई यांनी केली. या वेळी त्यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या. याप्रसंगी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्‍वर टोणपे, जिल्हा कृषी अधिकारी दशरथ काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. याबाबत मंत्री देसाई म्हणाले, ‘‘गेल्या दोन- तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, रस्ते, पूल व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांसमोर सोयाबीनच्या दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे, तसेच काही शेतकऱ्यांचे भुईमुगाचे बी उघड्यावर पडल्याचे दिसून आले आहे.

Heavy Rain

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे कृषी विभाग (Department of Agriculture), महसूल विभाग (Revenue Department) व ग्रामसेवक यांनी तत्काळ करून एकत्रित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करावेत. संबंधित प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाच्या निदर्शनास आणणार आहे.’’ शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी व अतिवृष्टीमुळे विस्कळित झालेली दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणार असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.

Minister Shambhuraj Desai Orders The Government To Conduct An Inquiry Into The Excess Rain Within Three Days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT