Shambhuraj Desai esakal
सातारा

भूस्खलनग्रस्त गावांचे भूगर्भतज्ञांकडून होणार सर्वेक्षण

तारळे विभागातील गावांना मंत्री शंभूराज देसाईंची भेट

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (सातारा) : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) तारळे विभागातील दरड कोसळण्याचा (Patan Taluka Landslide) धोका असलेल्या गावांतील नागरिकांना सुरक्षिततेसाठी तातडीने स्थलांतरीत करण्यात आले आहे. बाधित गावांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन अतिवृष्टीने व भूस्खलन झालेल्या बाधित गावांचे भूगर्भतज्ञांच्या समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतर त्या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल. तोपर्यंत तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी दिली.

अतिवृष्टीने डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांवर भूस्खलन होऊन दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

तारळे विभागातील अतिवृष्टीने बाधित गायमुखवाडी, कळंबे, डफळवाडी, केंजळवाडी, बागलेवाडी, जळव गावांची पहाणी व स्थलांतरीत नागरिकांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. अभिजित पाटील, बबनराव शिंदे, गजाभाऊ जाधव, सोमनाथ खामकर, संजय देशमुख, रणजित शिंदे, विजय पवार, नामदेवराव साळुंखे, माणिक पवार, किशोर बारटक्के, दीपक यादव, मंडलाधिकारी सीताराम कदम, तलाठी सचिन शेटे, श्री. घोरपडे, बांधकामचे अभियंता ए. बी. घोडके, संदिप पाटील, महावितरणचे अभियंता धर्मे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड, विविध खात्यांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, जुलैत अतिवृष्टीने डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांवर भूस्खलन होऊन दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला. अशा गावांना सुरक्षित ठिकाणी तातडीने स्थलांतरीत केले असून त्यांना शासनाकडून आवश्यक सुविधा दिल्या आहेत. सध्या शासकीय यंत्रणेकडून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबरोबरच बाधित झालेल्या गावांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे काम सुरु आहे. भविष्यात दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येईल. नुकसानीचे पंचनामे दोनच दिवसात पूर्ण करा. भूस्खलन झालेल्या बाधित गावांचे भूगर्भतज्ञांच्या समिती मार्फत सर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतर त्या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT