Rain Road Work esakal
सातारा

निकृष्‍ट रस्त्यावर कोट्यवधींची उधळपट्टी; गृहराज्यमंत्री घालणार लक्ष?

जालिंदर सत्रे

पाटण (सातारा) : रोहिणी नक्षत्राचा पाऊस (Rain) दहा दिवस कोसळत असतानाही डोंगराळ असलेल्या पाटण तालुक्यात रस्त्यांच्या (Road) डांबरीकरणाची कामे धडाक्यात सुरू आहेत. बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने तालुक्याच्या दुर्गम भागात चाललेल्या पावसातील डांबरीकरणाचा दर्जा राहणार का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठेकेदार व बांधकाम विभागाच्या (Construction Department) अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता घातलेला डांबरीकरणाचा घाट पावसाळ्यात वाहून जाणार आहे. (Minister Shambhuraj Desai Will Pay Attention To The Rain Road Works In Patan Taluka)

पाटण तालुक्यात रोहिणी नक्षत्राचा व जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सूनचा पाऊस हजेरी लावतो.

पाटण तालुक्यात रोहिणी नक्षत्राचा व जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सूनचा पाऊस (Monsoon Rain) हजेरी लावतो. त्यामुळे पाटण तालुक्यातील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत उरकली जातात. मे महिन्यात केलेल्या कामाचा दर्जा राहात नाही. फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यानच्या काळात केलेल्या डांबरीकरणाची कामे उन्हाळ्यातील उष्णतेमुळे एकजीव होतात. मात्र, तारळे, मोरणा, केरा, कोयना व ढेबेवाडी विभागाच्या पश्र्चिम भागात बांधकाम विभागातर्फे ऐन पावसात घाईगडबडीत डांबरीकरणाची कामे उरकली जात आहेत. तारळी धरण रिंगरोड-जळव खिंड-जांभेकरवाडी पोचरस्ता हे त्या रस्त्याचे उदाहरण आहे. दुर्गम भागातील अडाणी लोकांचा गैरफायदा घेत सर्व नियम धाब्यावर बसवून बांधकाम विभाग व ठेकेदार संगनमताने हा कारभार करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गृहराज्यमंत्र्यांनी विचारावा जाब

भरपावसात जून महिन्यात राजरोसपणे चाललेल्या डांबरीकरणाचा दर्जा राहणार का? मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला तर त्याची जबाबदारी कोणाची? अशी विचारणा ग्रामस्थ करत आहेत. बांधकाम विभाग व ठेकेदार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची घालून अशी उधळपट्टी करत असतील तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी त्यांच्या कानाला खडा लावायला हवा. पावसातील कामास जबाबदार ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जनता करत आहे.

Minister Shambhuraj Desai Will Pay Attention To The Rain Road Works In Patan Taluka

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT