MLA Shahaji Patil esakal
सातारा

Shahaji Patil : गुवाहाटीतही शहाजीबापूंसाठी माणदेशींनी केलं 'सगळंच ओक्के'; गोरेंनी सांगितला 'किस्सा'

आमदार गोरेंनी शहाजीबापूंबाबत गुवाहाटीत घडलेला किस्सा सांगितला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आमदार गोरेंनी शहाजीबापूंबाबत गुवाहाटीत घडलेला किस्सा सांगितला आहे.

गोंदवले (सातारा) : गुवाहाटीत (Guwahati) असताना काय हाटील.. काय हवा.. सगळं ओक्के मधी असणाऱ्या आमदार शहाजी बापूंसाठी (MLA Shahaji Patil) अस्सल माणदेशी जेवणाची सोय करून माण-खटावच्या (Man-Khatav) माणसांनी 'सगळं ओक्के' करून दिलं होतं, हे गुपित माणचे आमदार जयकुमार गोरेंनी (Jayakumar Gore) विरकरवाडीत उलगडलंय.

विरकरवाडी (ता. माण) इथं आयोजित बैलगाडी शर्यतीच्या बक्षीस वितरणासाठी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील व माणचे आमदार जयकुमार गोरे एकत्र आले होते. यावेळी आमदार गोरेंनी आमदार पाटील यांच्याबाबतीत गुवाहाटीत घडलेला किस्सा सांगितला. गोरे म्हणाले, देशाचं कुठलं बी शहर असं नाय जिथं माण-खटावची माणसं नाहीत. याचा प्रत्यय बापूंना गुवाहाटीत आलाय. तिथं सगळ्या सुखसोयी उपलब्ध होत्या. परंतु, तिथून त्यांचा फोन आला की, मला इथल्या जेवणाचं काय जमत नाय. मला भाकरी, भरलं वांग, ठेचा असं काय मिळतंय का बघा?

बापूंची ही मागणी पूर्ण करणारी आमची माण-खटावची माणसं गुवाहाटीत सुद्धा आहेत. त्यामुळं गुवाहाटीत सुद्धा शहाजी बापूंसह चाळीस आमदारांना रोज अस्सल माणदेशी जेवणाचा डबा मिळत होता. देशातील कुठलं शहर असं नाही, जिथं माण-खटावची माणसं नाहीत. माण तालुक्यातील १०३ गावांना पाणी पोचलंय. येणाऱ्या तीस चाळीस दिवसात जिहे-कठापूरचे पाणी येतंय. आता काही अडचण नाही. त्यामुळं पाण्याच्या बाबतीत 'सगळं ओक्के' आहे, असंही आमदार गोरेंनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT