सातारा

एकीने ठराविक लोकांची मक्तेदारी मोडीत; आमदार आसगावकरांचा विरोधकांना टोला

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड तालुक्‍यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळेच पदवीधर व शिक्षक मतदारसंघावर ठराविक लोकांची असणारी मक्तेदारी मोडण्यामध्ये यश आले, असे प्रतिपादन नवनिर्वाचित शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी येथे केले.

शिक्षक मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार आसगावकर यांचा कॉंग्रेसच्या वतीने ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, कोयना बॅंकेचे अध्यक्ष रोहित पाटील, कॉंग्रेसचे युवा नेते इंद्रजित चव्हाण, नगरसेवक आप्पा माने, प्रा. धनाजी काटकर, अशोकराव पाटील-पोतलेकर, जगदीश निकम आदी उपस्थित होते. आमदार आसगावकर म्हणाले, "कऱ्हाड तालुक्‍यातील मतदार व कार्यकर्ते यांनी चांगले काम केले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यानेच विजयश्री खेचून आणता आली. त्या माध्यमातून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर असणारी ठराविक लोकांची मक्तेदारी मोडण्यात यश आले आहे. यापुढेही शिक्षक, कार्यकर्ते यांना माझ्यापरीने सर्वतोपरी सहकार्य करेन.'' 

ऍड पाटील-उंडाळकर म्हणाले, "जिल्ह्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली. पदवीधर व शिक्षक मतदारसंघामध्ये काम केल्याने दोन्ही उमेदवारांचा प्रचंड मताधिक्‍याने विजय झाला आहे. यापुढेही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये याच पद्धतीने कामकाज करून विजयश्री खेचून आणली जाईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे.'' श्री. काटकर यांनी प्रास्ताविक केले. महादेव देसाई यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT