MLA Nilesh Lanke esakal
सातारा

'Ambulance'चं स्टेअरिंग हाती घेत आमदार लंके बनले 'सारथी'; फलटण मार्गावर सफर

बाळकृष्ण मधाळे

सातारा : जगभरात कोरोना (Coronavirus) थैमान घालत आहे, त्यात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. अशातच लोकांसाठी मदत कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील एका आमदाराची जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर अहमदनगरच्या पारनेरचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांच्या कार्याचे कौतुक होताना दिसत आहे. (MLA Nilesh Lanke Drive Ambulance On Phaltan Highway Satara Marathi News)

आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काही दिवसांपूर्वी एक हजार बेड्सचं कोव्हिड केअर सेंटर सुरू केलंय.

लंके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काही दिवसांपूर्वी एक हजार बेड्सचं कोव्हिड केअर सेंटर (Covid Care Center) सुरू केलंय. या ठिकाणी शंभर ऑक्सिजनच्या खाटा देखील आहेत. लंके हे स्वतः या कोव्हिड सेंटरमध्ये थांबून रुग्णांची काळजी घेत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कामाचा आढावा घेणाऱ्या अनेक बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. नुकतेच साताऱ्यातील फलटण मार्गावर आमदार लंके स्वतः अॅम्बुलन्सचं टेअरिंग हात घेत वाहन चालवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला असून त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, युवा वर्गाचे आदर्श ठरलेल्या आमदार लंकेंनी मास्क घालून Ambulance चालवायला हवी होती, असे मत नेटिझन्सकडून व्यक्त होत आहे.

निलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर सुरु केलीच, परंतु रुग्णांची देखभाल करण्यासाठी ते त्याच कोव्हिड सेंटरमध्ये झोपत होते. कोव्हिड सेंटरमध्ये जमिनीवर झोपल्याचा त्यांचा फोटो देखील व्हायरल झाला होता. मात्र, फलटण मार्गावरील त्यांची अॅम्बुलन्स चालवण्याची कृती देखील आणखी भाव खाऊन गेली. लंके स्वतः अॅम्बुलन्सचं टेअरिंग हात घेत ते कोविड रुग्णांचे सारथी बनले. तद्नंतर त्यांनी फलटणातील रुग्णालयांत जावून कोविड रुग्णांची विचारपूस करत काळजी घेण्याचे आवाहनही केले. या त्यांच्या कृ्तीचे अनेकांनी कौतुक करत हा त्यांचा व्हायरल व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या कामचं कौतुक केलंय.

MLA Nilesh Lanke Drive Ambulance On Phaltan Highway Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT