Shashikant Shinde esakal
सातारा

'विरोधकांत शरद पवारांची भीती निर्माण झालीये, त्या वाचाळवीरांना जनताच मतांद्वारे फोडून काढेल'; शिंदेंची पडळकर, सदाभाऊंवर टीका

MLA Shashikant Shinde : राज्यामध्ये सत्तारूढ महायुतीचे आमदार ज्या पद्धतीने मारा, झोडा, फोडा, तोडाची भाषा करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार यांनी राज्यात सुरू केलेल्या दौऱ्यामुळे विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच अशा वाचाळवीरांना पुढे केले जात असल्याचे आमदार शिंदे यांनी नमूद केले.

सातारारोड : राज्यामध्ये सत्तारूढ महायुतीचे आमदार ज्या पद्धतीने मारा, झोडा, फोडा, तोडाची भाषा करत आहेत, त्यावरून त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे आणि राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसते. या वाचाळवीरांना जनता मतांद्वारेच फोडून काढेल, अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासह महायुतीच्या आमदारांकडून शरद पवार यांच्याबरोबरच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केल्या गेलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.

शरद पवार यांच्यामुळेच पुरोगामी राज्याला जातिवादाने ग्रासले आहे, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्याचबरोबर आमदार सदाभाऊ खोत यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. मराठा समाजाला पाठिंबा असल्याचे पत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी द्यावे. त्यांनी आग लावण्याचे धंदे बंद करावेत, असे विधान आमदार खोत यांनी केले आहे.

पडळकर, खोत यांच्यासह महायुतीच्या आमदारांकडून शरद पवार यांच्याबरोबरच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केल्या गेलेल्या टीकेचा समाचार घेताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘शरद पवार यांचे राज्यासाठीचे योगदान विरोधकांना काय कळणार? आता निवडणुका आल्याने काही जणांना बोलायला सांगितले गेले असेल. ते जेवढे बोलतील, तेवढी शरद पवार यांच्याविषयीची आपुलकी वाढेल. मराठा आरक्षणाला सर्वच पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने पुन्हा स्वतंत्र पत्र देण्याचा प्रश्न येतो कुठे?

तुमच्या सरकारच्या हातामध्ये असताना तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही सरकारमधून खाली व्हा. मग निर्णय काय घ्यायचा, तो आम्ही घेऊ. आता एकमेकांवर टोलवाटोलवी करत तुम्ही वाद लावत बसला आहात. जातिवादाची बीजे पेरून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे कारस्थान बंद करावे, अन्यथा या निवडणुकीत लोक तुम्हाला मतांद्वारेच फोडून काढतील.’’

शरद पवार यांची भीती...

शरद पवार यांनी राज्यात सुरू केलेल्या दौऱ्यामुळे विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच अशा वाचाळवीरांना पुढे केले जात असल्याचे आमदार शिंदे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT