Shashikant Shinde esakal
सातारा

मी कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही, मीही 96 कुळी मराठाच : शशिकांत शिंदे

'त्या' मुलांनी भावनिक रोषातून आंदोलनाचा निर्णय घेतला असेल; पण त्यांना कोणतीही दमबाजी केली नसल्याची आमदार शिंदेंनी कबुली दिली.

उमेश बांबरे

सातारा : मी कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही; पण मी 96 कुळी मराठा असून, मराठा समाजाशी (Maratha Reservation) कधीही भावनिक राजकारण केले नाही. आंदोलनावेळी मराठा तरुण ज्यावेळी अडचणीत आला, त्या वेळी मी पुढाकार घेऊन त्यांना मदत केली आहे. साताऱ्यातील त्या, मुलांच्या कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी तेथे गेलेलो होतो. त्यांना कोणतीही दमबाजी केलेली नाही. ही मुले कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असली तरी ती मराठा आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण करायला मी समर्थ आहे, असे स्पष्टीकरण आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी नरेंद्र पाटलांच्या टीकेवर दिले आहे. (MLA Shashikant Shinde Criticizes Narendra Patil Satara News)

माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदेंवर टीका केली होती. त्याला श्री. शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ""मी मराठा आहे का नाही, हे मला व राज्यातील मराठा समाजातील नेत्यांना व तरुणांना माहीत आहे. मी कधीही मराठा समाजाचे भावनिक राजकारण केले नाही. या समाजासाठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे. ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलने झाली. त्या -त्या वेळी प्युअर मराठा म्हणून आंदोलनात अगदी आझाद मैदानापर्यंत सहभागी झालो होतो. सातारा जिल्ह्यात असो, नवी मुंबईत, कळंबोली असो अनेक ठिकाणी मराठा तरुणांना अटक झाली, ते अडचणीत आले. त्या वेळी मी पुढाकार घेऊन त्यांना मदत केली आहे.

साताऱ्यातील त्या मुलांना मीच मदत करत आहे. त्या मुलांनी भावनिक रोषातून आंदोलनाचा निर्णय घेतला असेल; पण त्यांना कोणतीही दमबाजी केलेली नाही. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना विनंती केली. मराठा आरक्षणाचा निर्णय हा एका पक्षाने घेतलेला नाही. मुळात ते ज्या पक्षाचे समर्थन करतात. त्या पक्षांची धोरणे स्पष्ट व्हावीत. देवेंद्र फडणवीस असो किंवा त्यांचे नेते 102 वी घटना दुरुस्ती त्यांनीच केली. कायदाही त्यांनीच केला. पुढे सरकार बदलल्यानंतर ते पुढे नेण्याचे काम आमच्या सरकारने केले. त्यांनी अभ्यास करावा. जनतेच्या भावनेशी खेळू नये.''

मी कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही. मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. उदयनराजेंनी आमदार खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका, या इशाऱ्यावर श्री. शिंदे म्हणाले, ""ज्यांची भूमिका स्पष्ट व प्रामाणिक असते. त्यांना कोणाचीच भीती नसते. ज्यावेळी मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले, त्या वेळी कोण पुढे होता, कोण कोणत्या पक्षात होता. आम्ही कोणत्या पक्षाबरोबर असलो तरीही आंदोलात सहभागी झालो. आंदोलनासाठी मराठा समाजाने बोलावलेल्या बैठकीला कोण आमदार, खासदार सहभागी होते, याची यादी काढा. त्यावरून कोणाला मराठा समाजाचा कळवळा आहे हे दिसून येईल.''

आंदोलनात सर्वात पुढे असेन

मराठा आरक्षण कोणी केले, मोदींनी केले, की फडणवीसांनी केले की या सरकारने केले, हा दोषारोप करून राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी आरक्षण कसे मिळवायचे यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. यापुढे ज्या वेळी मराठा समाजाचे आंदोलन होईल. त्या वेळी शशिकांत शिंदे सर्वात पुढे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

MLA Shashikant Shinde Criticizes Narendra Patil Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT