Shivendrasinharaje Bhosale esakal
सातारा

'पदाच्या हव्यासापोटी बिनबुडाचे आरोप, कोणाला घाबरायचं कारण नाही'

उमेश बांबरे

नावलौकिक असलेल्या बँकेवर संचालकपदाच्या हव्यासापोटी तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत.

सातारा : देशातील एक आदर्श बँक असा नावलौकिक असलेल्या बँकेवर संचालकपदाच्या हव्यासापोटी तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी बँकेवर आरोप करणाऱ्यांच्या फसवेगिरीला मतदार थारा देणार नाहीत. मी संघर्षातून वर आलो आहे. संघर्ष मला नवीन नाही. त्यामुळे कोणी काहीही करू द्या, कोणाला घाबरायचे काहीही कारण नाही. मी कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा शब्द जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी मतदारांना दिला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनिमित्त शेंद्रे येथील (कै.) अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनात बँकेच्या सातारा तालुक्यातील मतदारांच्या मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सतीश चव्हाण, माजी सदस्य राजू भोसले, सदस्य प्रतीक कदम, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, अनिल देसाई, माजी उपाध्यक्ष रवींद्र कदम, नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, जयवंत भोसले, लीना गोरे, सोनाली नलावडे, दीपलक्ष्मी नाईक, कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष विश्वास शेडगे, संचालक, रामभाऊ जगदाळे, लालासाहेब पवार, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, जितेंद्र सावंत, राहुल शिंदे, दयानंद उघडे, गणपत शिंदे, उत्तमराव नावडकर उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘आपला स्वार्थ साध्य होत नसल्याचे दिसताच रेटून खोटे बोलायचे आणि चांगल्या संस्थेची बदनामी करायची, लोकांची आणि मतदारांची दिशाभूल करायची हा प्रकार सध्या जोमात सुरू आहे. त्याने काहीही साध्य होणार नाही. उलट मतदार आणि जिल्हावासियांचे मनोरंजन होत आहे. राज्य आणि देशपातळीवर नावाजलेल्या जिल्हा बँकेबाबत अपुऱ्या माहितीच्या आधारे कोणी तथ्यहीन आरोप करत असेल, तर त्या बँकेचा अध्यक्ष म्हणून त्या आरोपांचे खंडण करणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे माझे कर्तव्यच आहे. गेले पाच- सहा वर्ष चेअरमन म्हणून काम करताना बँकेची आर्थिक स्थिती आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न मी केला आहे.’’ सतीश चव्हाण, चंद्रकांत जाधव यांचेही मनोगत झाले. राजू भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Shortage Rumor : युद्धाच्या अफवेने 'इंधन' भडकलं! मुक्ताईनगरमध्ये 500 लिटरच्या प्लास्टिकच्या टाक्यांत भरलं जातंय पेट्रोल-डिझेल; पाहा धक्कादायक Video

Pune News: पुणे ‘आरटीओ’त लाचखोरीचा ‘कळस’; वाहननिरीक्षकाची तक्रार, पदोन्नतीला ‘ब्रेक’ची शक्यता, त्या’ बड्या धेंडांवर कारवाई होणार का?

Summer Fashion Tips: उन्हाळ्यात दिवसभर कूल, फ्रेश आणि सुपर स्टायलिश दिसायचंय? मग ‘हे’ फॅब्रिक्स नक्की ट्राय करा!

भीषण वास्तव! घरगुती गॅससाठी दाहीदिशा वणवण, अखेर हताश महिलेनं उचललं टोकाचं पाऊल; नेमकं काय घडलं?

CSK vs RR: जड्डू... जड्डू... चाहत्यांच्या घोषणा ऐकून रवींद्र जडेजा खरंच झाला इमोशनल? Video तुफान Viral

SCROLL FOR NEXT