Shivendrasinharaje Bhosale esakal
सातारा

निवडणुकीत कुणीही, काहीही करू दे, काही फरक पडत नाही : शिवेंद्रराजे

उमेश बांबरे

उदयनराजेंचा निर्णय खासदार शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार व सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे घेतील.

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या (Satara Bank Election) निमित्तानं जिल्ह्यात राजकारण चांगलंच रंगलंय. बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी दंड थोपटले आहेत. जिल्हा बँकेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्यांनाच सभासदांनी मतदान करावे. केवळ जागा आडविण्यासाठी आणि सातारा जिल्हा बँक ही देशातील सहकारातील मोठी संस्था आहे. म्हणून, मला तेथे गेले पाहिजे. यासाठी मागील वेळी दबाव टाकून संचालक झालेल्यांना आता घरी बसविण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी खासदार उदयनराजेंचा (MP Udayanraje Bhosale) नामोल्लेख टाळून केली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी सर्वच दिग्गज नेते अर्ज दाखल करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सहभागी असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आज अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्याशी सुरूची या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी संवाद साधला. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, गेली पाच वर्षे सातारा जिल्हा बँकेत भाऊसाहेब महाराजांच्या नंतर संचालक व अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. गेली पाच वर्षे बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालले. देशात व राज्यात बँक कायम एक नंबरला राहिलीय. यावेळच्या निवडणुकीत सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, तसेच आमदार मकरंद पाटील, शशीकांत शिंदे असे मिळून जे पॅनेल होत आहे. त्यामुळे बँकेच्या सभासदांच्या विश्वासावर आमच्या पॅनेलचा विजय होणार आहे.

कोणी किती टीका टीपण करू देत, कोणी काहीही करू देत, काहीही फरक पडणार नाही. राष्ट्रवादीच्या सर्वसमावेश पॅनेलचा विजय होणार आहे. बँकेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्यांनाच यावेळी सभासदांनी मतदान करावे, असे आवाहन करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, केवळ जागा आडविण्यासाठी आणि जिल्हा बँक देशातील सहकारातील मोठी संस्था आहे, म्हणून मला तेथे गेले पाहिजे. यासाठी मागील वेळी दबाव टाकून संचालक झालेल्यांना आता घरी बसविण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका त्यांनी उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून केली. उदयनराजेंचा निर्णय खासदार शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार व सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे करतील, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT