Ajit Pawar-Shivendrasinharaje Bhosle esakal
सातारा

मला अध्यक्षपदावर पुन्हा संधी द्या; भाजप आमदाराची अजित पवारांकडे मागणी

उमेश बांबरे

निवडणुकीनंतर अध्यक्षपदावर संधी मिळावी, म्हणून काही संचालकांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय.

सातारा : जिल्हा बॅंकेच्या (Satara District Bank Election) अध्यक्षपदावरून सध्या राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांत रस्सीखेच सुरू आहे. त्यातच मागील वेळी बॅंक चांगल्या प्रकारे चालवणारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी काल मुंबई (Mumbai) येथे मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. मागील पंचवार्षिकमध्ये सर्वांना बरोबर घेऊन बॅंक चालवली आहे. त्यामुळे यावेळेसही सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची संधी द्या, अशी अपेक्षा त्यांनी श्री. पवार यांच्यापुढे मांडली. यासंदर्भात आपण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) व पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्याशी बोलतो, असा शब्द श्री. पवार यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेल्या शिवेंद्रसिंहराजेंचे पारडे जड झाल्याचे चित्र आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदावर संधी मिळावी, म्हणून काही संचालकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये वाईचे नेते नितीन पाटील (Nitin Patil) यांचे नाव आघाडीवर आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीतून पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर, महाबळेश्वरचे राजेंद्र राजपुरे हेही इच्छुकांच्या रेसमध्ये आहेत. त्यासोबतच विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही इच्छुक आहेत. मागील पाच वर्षे सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळावी, अशी त्यांचीही अपेक्षा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुंबईत ठाण मांडून आहेत. काहींनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन आगामी नगरपंचायत, पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील नेमकी परिस्थिती व आगामी निवडणुकीत कोणती रणनीती वापरायची, याविषयी चर्चा करून सल्ला घेतला आहे. काल दुपारी दोनच्या सुमारास शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत बॅंकेचे संचालक अनिल देसाई उपस्थित होते.

अजित पवार कोणाचे नाव निश्चित करणार?

या वेळी शिवेंद्रसिंहराजेंनी मी बॅंकेच्या अध्यक्षपदावर आगामी काळातही काम करण्यास इच्छुक असून, मागील वेळी सर्वांना सोबत घेऊन बॅंकेचे कामकाज चांगल्या पध्दतीने केले आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा संधी द्यावी, अशी मागणी केली. या वेळी श्री. पवार यांनी यासंदर्भात मी रामराजे निंबाळकर व बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलून ठरवतो, असे सांगितले आहे. बॅंक आगामी काळात चांगल्या प्रकारे चालवा, केवळ कारखान्यांनाच कर्ज देऊन बॅंक मोठी होणार नाही, इतर संस्थांनाही कर्जपुरवठा करण्याबाबतचे धोरण घ्यावे. आगामी काळातही बॅंक सर्वांनी मिळून एकत्र कामकाज करून चांगल्या प्रकारे चालवा, अशी अपेक्षा श्री. पवार यांनी व्यक्त केली. अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आतापर्यंत नितीन पाटील उघडपणे पुढे आले होते. आता शिवेंद्रसिंहराजेंनीही श्री. पवार यांची भेट घेऊन मागणी केल्याने या पदाच्या निवडीतील चुरस वाढली आहे. अजित पवार कोणाचे नाव निश्चित करणार की खासदार शरद पवारांशी चर्चा करून राष्ट्रवादीतील संचालकाचे नाव सुचवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT