'अजिंक्यतारा' ऊसदर देण्यास कटिबध्द : शिवेंद्रसिंहराजे esakal
सातारा

'अजिंक्यतारा' ऊसदर देण्यास कटिबध्द : शिवेंद्रसिंहराजे

आज जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आर्थिकदृष्ट्या एक भक्कम आणि सक्षम सहकारी संस्था म्हणून कारखान्याला ओळखले जाते

उमेश बांबरे -सकाळ वृत्तसेवा

आज जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आर्थिकदृष्ट्या एक भक्कम आणि सक्षम सहकारी संस्था म्हणून कारखान्याला ओळखले जाते.

सातारा: (कै.) भाऊसाहेब महाराजांनी तालुक्यातील जनतेच्या साक्षीने आणि सहकार्याने लावलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखानारूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आर्थिकदृष्ट्या एक भक्कम आणि सक्षम सहकारी संस्था म्हणून कारखान्याला ओळखले जाते. या वेळच्या गळीत हंगामातही अजिंक्यतारा कारखाना शेतकऱ्यां‍ना किफायतशीर दर देण्यासाठी कटिबध्द राहील, असा विश्वास कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष विश्‍वास शेडगे, संचालक व मान्यवर उपस्थित होते. कारखाना गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपीनुसार वेळेत पेमेंट अदा करत आहे. इतर कारखान्यांची परिस्थिती पाहता आपल्याच कारखान्याला ऊस घालण्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल आहे आणि ही बाब आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची आहे, असे सांगून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,‘‘ यंदाच्या गळीत हंगामात सात लाख ५० हजार मेट्रिक टन एवढ्या विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट आहे. हा विक्रम आपला कारखाना निश्चितच करणार आहे.

कारखान्याने गाळप क्षमता वाढवण्याबरोबरच टप्प्याटप्प्याने डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्पांचेही विस्तारीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत आपल्या कारखान्याच्या साखरेचा दर्जा चांगला असून कारखाना दरही उच्चतम देत आहे. ’’ विश्वास शेडगे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. संचालक नामदेव सावंत यांनी आभार मानले.

कार्यक्रमास कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, चंद्रकांत जाधव, सतीश चव्हाण, किरण साबळे-पाटील, पंचायत समिती सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, सदस्य जितेंद्र सावंत, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, छाया कुंभार, धर्मराज घोरपडे, मिलिंद कदम, प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, शिवाजी सावंत, दिलीप फडतरे, सुनील काटे, गणपतराव शिंदे, विक्रम पवार, ॲड. सूर्यकांत धनावडे, उत्तमराव नावडकर, जालिंदर महाडिक, पंडितराव सावंत, गणपत मोहिते, दादा पाटील, अरविंद चव्हाण, अजित साळुंखे, लालासाहेब पवार, कृष्णा धनवे, सयाजी कदम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT