Shivendrasinharaje Bhosale esakal
सातारा

मृगजळ बनून बाहेरून येणाऱ्यांच्या मागे धावू नका

उमेश बांबरे

सातारा : मी कोणत्याही पक्षात असलो, तरी विकासकामांत कुठेही अडचण आलेली नाही आणि कधी येणारही नाही. जे लोक तालुक्यात कार्यरत आहेत. तुमच्या सुख, दुःखात तुमच्या सोबत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पाठीशी ठाम राहा. मृगजळ बनून बाहेरून येणाऱ्यांच्या पाठीमागे धावू नका. राजकारणापेक्षा (Politics) जावळीच्या विकासाला कायम प्राधान्य दिले असून, जावळीतील जनतेला सोडून मी कधीही जाणार नाही, असा शब्द आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी दिला.

मी कोणत्याही पक्षात असलो, तरी विकासकामांत कुठेही अडचण आलेली नाही आणि कधी येणारही नाही.

जावळी तालुक्यातील सर्जापूर ग्रामपंचायतीच्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन, तसेच बर्गे वस्ती रस्ता खडीकरण, सटवाई रस्त्याचे डांबरीकरण व लसीकरण कँपचे उद्‌घाटन अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी उपसभापती सौरभ शिंदे, माजी सभापती अरुणा शिर्के, जयदीप शिंदे, प्रकाश मोहिते, सरपंच स्वागता बोराटे, उपसरपंच शंकर मोहिते, देविदास बोराटे, मयूर बाबर, सारिका मोहिते, सुरेखा मोहिते, मनीषा बोराटे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

गेल्या १२ वर्षांपासून जावळीच्या जनतेसाठी मी झटत आहे. विकासकामांत मी कधीच सातारा, जावळी असा भेदभाव केला नाही व कधी करणारही नाही, असे सांगून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘विकासकामांबरोबरच तालुक्यातील सर्व अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने केला आहे. तुमच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तत्पर असून, जो खऱ्या अर्थाने तुमची कामे करतो त्याच्या पाठीशी कायम राहा.’’ अतुल बोराटे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन मोहिते यांनी प्रास्ताविक केले. कीर्तनकार नलावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

Eleventh Admission : अकरावी प्रवेशासाठी अंतिम संधी

CM Devendra Fadnavis : सरकार दबावाने नव्हे, संविधानानुसार चालते; जीसीसीमध्ये पुणे देशात अव्वल ठरणार

विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली, शिक्षकांनी रुग्णालयात नेण्याऐवजी आश्रमशाळेतच केला मंत्रोपचार, मेळघाटातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT