Shivendrasinharaje Bhosale Shivendrasinharaje Bhosale
सातारा

पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फेरीवाल्यांना फटका; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा आरोप

कोरोना आणि लॉकडाउनमुळे गेल्या वर्षात फेरीवाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना आणि लॉकडाउनमुळे गेल्या वर्षात फेरीवाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या वर्षी लॉकडाउनमध्ये मुख्यमंत्र्यांनी फेरीवाल्यांना दिलासा देण्यासाठी 1500 रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. सातारा नगरपालिकेने गेल्या साडेचार वर्षांपासून शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी केली नाही तसेच त्यांना परवानेही दिलेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजपासून फेरीवाले वंचित राहणार आहेत. फेरीवाल्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पालिकेने तातडीने त्यांची नोंदणी करून त्यांना रितसर परवाने दिले पाहिजेत, अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दिपत्रकात शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले, की कोरोना आणि लॉकडाउनमुळे जीवितहानीसह वित्तहानी झाली. समाजातील असंख्य घटकांवर उपासमारीची वेळ आली. यामध्ये शहरातील फेरीवाल्यांचाही समावेश होता. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या लॉकडाउनमध्ये फेरीवाल्यांचे नुकसान टाळण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी एक हजार 500 रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. ही रक्कम संबंधित फेरीवाल्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे.

मात्र, नोंदणी आणि परवाना नसल्याने या पॅकेजपासून साताऱ्यातील फेरीवाल्यांना वंचित राहावे लागणार आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून पालिकेने शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी केली नाही. तसेच त्यांना परवानेही दिलेले नाहीत. एवढ्या छोट्याशा गोष्टीला पालिकेला वेळ मिळाला नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. पालिकेच्या ढिसाळ, निष्काळजी आणि मनमानी कारभाराचा फटका फेरीवाल्यांना बसणार आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळे आधीच बेजार झालेल्या फेरीवाल्यांना शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजचा लाभ मिळालाच पाहिजे. त्यामुळे पालिकेने तातडीने फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना परवाने द्यावेत. सरकारच्या पॅकेजचा लाभ मिळण्यातील अडसर त्वरित दूर करावा, अशी स्पष्ट भूमिका शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतली आहे.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT