सातारा

आमदारांचा अनोखा अंदाज! कार्यकर्त्यांच्या गराड्यातून शिवेंद्रसिंहराजे पोहचले थेट शेतात!

Balkrishna Madhale

सातारा : सातारा जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे नेहमी जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरात आपल्या कार्यकुशलतेने आणि नेतृत्वाने चर्चेत असतात. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून थेट ते शेतात उतरले असून त्यांनी आपल्या शेतात कसदार शेतकऱ्याप्रमाणे ट्रॅक्टर चालविला आहे. त्यांचा हा व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाल्याने शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात पुन्हा चर्चेत आले आहेत. 

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पक्ष कोणताही असो आपल्या मतदारसंघातील प्रश्‍न शासन दरबारी मांडण्यासाठी अग्रेसर असतात. त्यांनी कोरोना काळातही आपल्या मतदार संघात जाऊन ग्रामस्थांचे मनोबल वाढविले आहे. याबरोबरच शिवेंद्रसिंहराजे यांचा फिटनेस फंडा तर सातारकरांच्याबरोबरच अख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यात सायकलिंग, मॅरेथॉन, ट्रेकिंग आलंच. ट्रेकिंगचं म्हणाल तर त्यांनी हिमालयातही बेस कम्प केला आहे. तसेच पॅराग्लाडिंगही केले आहे.

आता जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो शिवेंद्रसिंहराजे यांचा शेतात कसदार शेतकऱ्याप्रमाणे ट्रॅक्टर चालविण्याचा. प्रत्येक वर्षी दिवाळी संपली की ते आपल्या दौंडला येथील फार्महाऊसवर हमखास जातात. तसेच त्यांचा आवर्जून शेतीकडे फेरफटका हा असतोच. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे आपल्या शेतातील मातीत उतरून कसदार शेतकऱ्याप्रमाणे ट्रॅक्टर चालवणे, शेतात फेरफटका मारणे, शेतीची पूर्ण पाहणी करणे, हे त्यांचे आवडीचे काम. ते कुटुंबीयांसमवेत शेतात रमल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : अवघी पंढरी विठ्ठलमय! 20 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

SCROLL FOR NEXT