Satara Selfie Point esakal
सातारा

शिवेंद्रराजेंनी उभारलेल्या 'राजधानी सातारा'वर उदयनराजेंचा कडक Selfie

सकाळ डिजिटल टीम

पोवई नाका येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्वखर्चातून 'सेल्फी पॉईंट' उभारला आहे.

सातारा : शहरात पोवई नाका येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी (MLA Shivendrasinharaje Bhosale) स्वखर्चातून 'सेल्फी पॉईंट' उभारला आहे. आज (मंगळवार) सायंकाळी सहा वाजता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह (Shekhar Singh) यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. त्या आधीच खासदार उदयनराजेंनी (MP Udayanraje Bhosale) सेल्फी पॉईंटची पाहणी केली. तेथे उदयनराजेंना पाहून काहींनी त्यांचे सेल्फी पॉईंटसह छायाचित्र काढले. उदयनराजेंनी देखील सहकाऱ्यांसमवेत तेथे फोटो काढले.

जिल्हा बॅंकेत (Satara Bank Election) राष्ट्रवादीच्या (NCP) सर्वसमावेशक पॅनेलमध्ये घ्यावे, या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी मागील सर्व मतभेद विसरून भेटीगाठीचे सत्र सुरू ठेवले आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यात जोरदार टीकाही सुरू आहेत. त्यातच उदयनराजे यांनी उद्घाटनापूर्वीच केलेल्या पाहणीमुळे आता शिवेंद्रराजे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय.

बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे. त्यामध्ये केंद्रस्थानी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आहेत. एकीकडे उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सहभागी करून घेण्याचा मुद्दा, तर दुसरीकडे आमदार शिवेंद्रसिंहराजेंकडून उदयनराजेंना होणारा विरोध आणि पाच जागांची मागणी यावरच सध्या चर्चेचा खल सुरू आहे. त्यातच आज आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्वखर्चातून उभारलेल्या 'सेल्फी पॉईंट'ची खासदार उदयनराजेंनी पाहणी केल्याने राजकीय चर्चेंना उधाण आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT