Udayanraje Bhosale-Shivendrasinharaje Bhosle
Udayanraje Bhosale-Shivendrasinharaje Bhosle esakal
सातारा

'एवढीच बुद्धी होती, तर संचालक होण्‍यासाठी नेत्‍यांचे उंबरे का झिजविले?'

गिरीश चव्हाण

'मी भाजपत गेल्‍यानंतर ते आले. कदाचित, त्‍यांना इर्ष्या वाटली असावी म्‍हणून ते आले असतील.'

सातारा : ‘ते’ मोठे असल्‍याने त्‍यांची बुद्धी मोठी असेल. मी लहान असल्‍याने माझी बुद्धी लहान असेल. मी ते मान्‍य करतो. खासदारसाहेबांची बुद्धी अचाट आणि अफाट आहे. त्‍यांच्‍या बुद्धीशी आमची तुलना होऊ शकत नाही. या अफाट बुद्धीमुळेच लोकांतून निवडून आलेली लोकसभा घालवून मागच्‍या दाराने ते राज्‍यसभेत जाऊन बसल्‍याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्‍यावर केली. आगामी नगरपालिका निवडणूक (Satara Municipal Election) स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कास येथील विविध विकासकामांच्‍या उद्‌घाटनावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंवर टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना शिवेंद्रसिंहराजे म्‍हणाले, ‘‘आमच्‍या नेतृत्वाखालील दोन्‍ही बँकांचे रिझर्व्‍ह बँकेच्‍या सूचनेनुसार योग्‍य पद्धतीने विलीनीकरण झाले असून, कोणाचा एक रुपयाही बुडला नाही. या बँकांचे विलीनीकरण होऊ नये, यासाठी त्‍यांनी त्‍या वेळी फार प्रयत्‍न केले होते. मी कोणाचेही घर फोडले नाही किंवा तसा घरफोडीचा कोणताही गुन्‍हा माझ्‍यावर नोंद नाही. त्‍यांची बुद्धी खरच अफाट आणि अचाट आहे. ही बुद्धी त्‍यांनी साताऱ्यातील रखडलेले प्रकल्‍प मार्गी लावण्‍यासाठी वापरली पाहिजे; पण तसे होताना दिसत नाही. खासदार आपली बुद्धी प्रकल्‍पातील पैसा काढण्‍यासाठी वापरत आहेत.’’

लोकांतून निवडून आलेल्‍या लोकसभेचा राजीनामा देत ते भाजपत (BJP) गेले. ते कशासाठी गेले हे त्‍यांना अजूनही समजले आहे का, असा प्रश्‍‍न उपस्‍थित करत पुढच्‍या दाराने गेल्‍यानंतर राजीनामा देऊन ते पुन्‍हा मागच्‍या दाराने राज्‍यसभेत गेलेत. त्‍यात त्‍यांच्‍या अफाट बुद्धीचा पराक्रमच होता. मी भाजपत गेल्‍यानंतर ते आले. कदाचित त्‍यांना इर्ष्या वाटली असावी म्‍हणून ते आले असतील; पण त्‍यात त्‍यांच्‍या बुद्धीचा सहभाग आहे, अशी टीकाही शिवेंद्रसिंहराजेंनी केली. पालिका निवडणुका आल्‍या, की ते जुन्‍या टेप वाजवतात. आता निवडणूक आलीय, ते नवीन डायलॉग घेऊन समोर येतील. सातारकरांनी चार महिन्‍यांचा विकास पाहिजे का, निरंतर नियोजित साडेचार वर्षे होणारा विकास पाहिजे, हे ठरविणे गरजेचे असून, कोणत्‍याही परिस्‍थितीत पालिकेच्‍या आगामी निवडणुका नगर विकास आघाडी स्‍वबळावर लढविणार असल्‍याचेही शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

दिवाळीचा डबा घेऊन का फिरला

जिल्‍हा बँक निवडणूक (Satara District Bank Election) झाल्‍याने ते आता अजिंक्‍य उद्योग समूहावर बोलत आहेत. एवढीच बुद्धी होती, तर संचालक होण्‍यासाठी जिल्ह्यातील नेत्‍यांचे उंबरे का झिजविले, दिवाळीचा डबा घेऊन फिरायची वेळ का आली, याचेही उत्तर खासदारांनी देणे आवश्‍‍यक आहे. एवढे सगळ करून निवडून आल्‍यानंतर साहेब गायब. ते मतदानालादेखील आले नाहीत. आता पुढच्‍या निवडणुकीवेळीच ते भेटणार, बोलणार अशी टीकाही शिवेंद्रसिंहराजेंनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT