सातारा

'तुमच्या आमदारांना सांगा अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलायला'

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : "आरक्षणाबाबत एवढा अन्याय सुरू असताना तुम्ही गप्प का...? तुम्ही मराठा आहात, की राजकीय मराठा? निवडणुकीवेळी तुम्ही तुमच्या आवडीच्या पक्षांबरोबर राहा; पण आता राजकीय जोडे बाजूला ठेऊन न्याय्य हक्काच्या लढ्यात उतरा, तत्पूर्वी तुम्ही निवडून दिलेल्या आमदारांना फोन करून अर्थ संकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलायला सांगा,' असे आवाहन अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी नुकतेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना केले. 

ते म्हणाले, ""आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी निगडित असलो, तरी सर्वांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे आपण सर्व जण मराठा आहोत. आर्थिक निकषावर आधारित आरक्षणासाठी वेगवेगळ्या संघटना 1980 पासून लढत आहेत. माझे वडील (कै.) आमदार अण्णासाहेब पाटील यांनी त्यासाठी पहिले बलिदान दिले आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर सर्व मराठा समाज एकवटला. 52 क्रांती मोर्चे निघाले. 42 मराठा बांधवांनी बलिदान दिले. 

सातारा जिल्हावासियांनाे! जाणून घ्या 23 केंद्र जेथे मिळेल तुम्हाला कोरोनावरील लस 

यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षण, वसतिगृह, सारथी यासारख्या सवलतींचे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या केलेल्या पुनर्गठनाचे पुढे काय झाले? याचा गांभीर्याने विचार करा. त्यात सध्याच्या सरकारने थोडी जरी भर टाकली असती तर सोन्याहून पिवळे झाले असते; परंतु आता आहे तेच बंद पाडले आहे. कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून प्रत्येक तालुक्‍यात अशी ठिय्या आंदोलने सुरू करून सरकारचे आरक्षणाकडे लक्ष वेधावे.'' 

नरेंद्र पाटील म्हणाले... 

अनेक राजकारणी जाड कातडीचे असतात 

जनतेतून सभागृहात गेल्यावर प्रश्नच विसरून जातात 

अण्णासाहेब पाटील यांच्यासह 42 समाज बांधवांचे बलिदान व क्रांती मोर्चाचे श्रम वाया जाऊ देणार नाही 

एक लाख मराठा उद्योजक तयार केल्याशिवाय हा अण्णासाहेबांचा मुलगा स्वस्थ बसणार नाही 

यापूर्वी आंदोलनात उतरलेले अनेक जण आता गप्प का आहेत..? 

तुम्ही मत दिलेल्या प्रत्येक आमदारांना आरक्षणावर बोलते करा 

प्रत्येक तालुक्‍यात ठिय्या आंदोलन सुरू करा 

कऱ्हाडकरांनाे! जाणून घ्या अर्थसंकल्पातील जनशक्तीची उपसूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT