Maharashtra Navnirman Sena esakal
सातारा

मतदारांच्या जीवाशी खेळ! 'कृष्णा'ची निवडणूक ताबडतोब रद्द करा

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : कोरोनाने (Coronavirus) समाजजीवन अडचणीत आले असून त्यासाठी कडक टाळेबंदीसारखा (Lockdown) कटू प्रयोग राबविणे क्रम प्राप्त झालेले आहे. अशा बिकट स्थितीत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (Krishna Cooperative Sugar Factory) निवडणुकीची झालेली प्रक्रिया रद्द करावी, अशी आग्रही मागणी मनसचे (Maharashtra Navnirman Sena) शहराध्यक्ष सागर बर्गे (Sagar Barge) यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्याकडे केली आहे. (MNS Demands Postponement Of Election Of Krishna Sugar Factory Satara Political News)

कोरोनाने समाजजीवन हादरले आहे. त्याचे गांभीर्य समजून नागरिकांनी टाळेबंदीचा अपरिहार्यपणे पर्याय स्वीकारला आहे.

बर्गे यांनी दिलेल्या निवदेनात म्हटले आहे, की कोरोनाने समाजजीवन हादरले आहे. त्याचे गांभीर्य समजून नागरिकांनी टाळेबंदीचा अपरिहार्यपणे पर्याय स्वीकारला आहे. टाळेबंदीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन अहोरात्र झटत आहे. नागरिकांचाही प्रतिसाद आहे. व्यापारी, शेतकरी, फेरीवाले, मजूर, कामगार, विद्यार्थ्यांसह अनेकजण कोरोनावर मात करण्यासाठी कटिबध्द होत आहे. असे असताना कृष्णा कारखन्याची निवडणूक (Krishna Factory Election) होत आहे. हा विद्यमान परिस्थितीशी विरोधाभास आहे. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रिया नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. दैनंदिन जीवनावर निर्बंध घालताना निवडणूकांसारखे कार्यक्रम राबविले जात असतील तर यासारखे दुर्दैव नाही.

नागरिकांमध्ये असणारे कोरोनाचे गांभीर्य टिकवून ठेवायचे असेल, तर निवडणुका पुढे ढकलणे ही काळाची गरज आहे. या निवडणूक प्रक्रियेत येणारे सातारा, सांगली जिल्ह्यातील मतदार, राबणारी शासकीय यंत्रणा या सगळ्यांच्या जीवाशी खेळ तर होत नाही ना, याचा विचार होण्याची गरज आहे. पाच राज्यांसह पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर तेथे वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सध्या होऊ घातलेली कृष्णा कारखान्याची निवडणूक स्थगित करून पुढे योग्य वेळी घ्यावी. कृष्णाच्या निवडणुकीत उतरणारे मान्यवर समाजातील संवेदनशील नेते आहेत. जनतेच्या उज्वल भविष्यासाठी सदैव प्रयत्न करतात. त्या सर्व नेत्यांनीही निवडणूक स्थगितीचा आग्रह धरावा.

MNS Demands Postponement Of Election Of Krishna Sugar Factory Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT