MNS President Raj Thackeray esakal
सातारा

Satara : उंब्रजला राज ठाकरेंचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत; ग्रामीण भागात लोकप्रियता कायम

फटाक्यांच्या आतषबाजीत राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

कार्यकर्ते यांनी गर्दी केल्याने राज ठाकरे यांनी आपल्या कारच्या बाहेर येऊन कार्यकर्त्यांना हात जोडत नमस्कार करून रत्नागिरीकडे रवाना झाले.

उंब्रज (सातारा) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे येथे मनसेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, राज ठाकरे यांचा नियोजित रत्नागिरी दौऱ्यात पुण्यानंतर थेट उंब्रज येथे स्वागतासाठी थांबणार असल्याने मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

काल (शुक्रवार) राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर (Raj Thackeray on Ratnagiri Tour) जाताना दुपारी एक वाजता कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर उंब्रज येथे स्वागतासाठी थांबणार होते. दुपारी एक वाजता येणारे राज ठाकरे यांचे साडेतीन वाजता उंब्रज (Umbraj) येथे आगमन झाले. त्यांचे येथे आगमन होताच त्यांना भेटण्यासाठी जिल्हा व तालुक्यातून आलेले मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकच गर्दी केली होती.

फटाक्यांच्या आतषबाजीत राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे, तालुकाध्यक्ष रणजित कदम, विजय वाणी, मीनाक्षीताई पोळ आदींनी त्यांचे स्वागत केले. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गर्दी केल्याने राज ठाकरे यांनी आपल्या कारच्या बाहेर येऊन कार्यकर्त्यांना हात जोडत नमस्कार करून रत्नागिरीकडे रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT