सातारा

साताऱ्यातील मूकमोर्चा स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चेअंती निर्णय

उमेश बांबरे

सातारा : कोरोनाची बाधित रुग्णांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कारभारात सुधारणा करावी, तसेच भेडसावणारे प्रश्न सोडवावेत अन्यथा मूकमोर्चा काढू, असा इशारा समस्त सातारकरांच्या वतीने नगरसेवक अमोल मोहिते यांनी प्रशासनास दिला होता. 

शुक्रवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यासंदर्भात विस्तृत चर्चा केली. सर्वसामान्यांच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याची भूमिका त्यांनी मांडल्याने सोमवारचा (ता. 28) मूकमोर्चा स्थगित केला असल्याची माहिती नगरसेवक मोहिते यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली. शेखर सिंह म्हणाले, "जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी किती बेड उपलब्ध आहेत, हे येत्या दोन दिवसांत डॅशबोर्डद्वारे प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले. प्रत्येकी दोन तासाला अपडेट दिले जातील. जम्बो हॉस्पिटल ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू केले जाईल. जिल्हा क्रीडा संकुल येथील दोन्ही हॉलमध्ये पूर्वतयारी सुरू केली जाईल. 

शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी दहा हजार रेमडिसिव्हर इंजेक्‍शनची ऑर्डर दिली आहे. येत्या आठवड्यात ती उपलब्ध होतील. खासगी रुग्णालयांनाही ही इंजेक्‍शन्स उपलब्ध करून दिली जातील. गर्भवती महिलांसाठी त्यांचे हाल होऊ नयेत, म्हणून विशेष काळजी घेतली जाईल. प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर महात्मा फुले योजनेचा बोर्ड, सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यामध्येच पेशंट्‌स व जादा बिले घेणाऱ्यांवर कडक बंधने घातली जातील. याबरोबरच प्लाझ्माचा तुटवडा भासू नये, म्हणून जिल्हा रुग्णालयासह चार ठिकाणी प्लाझ्मा ब्लड बॅंक्‍सला परवानगी दिली जाईल.'' या वेळी सर्वानुमते निर्णय होऊन सोमवारचा मूकमोर्चा स्थगित केल्याचे श्री. मोहिते यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT