सातारा - साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहिते पुढील आठवड्यात जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या कांचनगंगा गिरीशिखरावर चढाई मोहिमेत सहभागी होणार आहे. या खडतर मोहिमेचा खर्च मोठा असल्याने या मोहिमेसाठी जिल्हा बँकेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत प्रियांका मोहिते हिला आर्थिक मदत करण्यात आली आहे. या वेळी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या हस्ते प्रियांका मोहितेचे वडील मंगेश मोहिते यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
प्रियांका मोहिते हिच्या कुटुंबीयांनी या मोहिमेसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्हा बँकेने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदत केली आहे. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, सुरेश सावंत, लहुराज जाधव, संचालिका ऋतुजा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे उपस्थित होते.
नितीन पाटील म्हणाले,‘‘ जिल्हा बँक कायमच सामाजिक बांधिलकी जपत असून, जिल्हा बँकेने समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. (कै.) यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत कृषी व सहकारी क्षेत्रातील कार्य बँक आज तळमळीने व निष्ठेने करीत असून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध प्रकारे अर्थसाह्य केलेले आहे. याची जाणीव ठेऊन बँकेने आर्थिक मदत केली आहे.’’
या वेळी डॉ. राजेंद्र सरकाळे यांचेही भाषण झाले. प्रियांकाच्या पुढील वाटचालीस बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संचालक व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील तसेच सर्व संचालकांनी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.