सातारा

एफआरपीप्रश्नी रयत क्रांती संघटना आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

उमेश बांबरे

सातारा : गत हंगामातील गाळप उसाला सातारा जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी शेतक-यांना पूर्ण एफआरपीची रक्कम आदा केली नाही, त्यामुळे जिल्ह्यातील ऊसउत्पादक अजून एफआरपीच्या प्रतीक्षेत राहिला आहे. ती ताबडतोब मिळावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
 
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात गत हंगामातील उसाची एफआरपी केवळ अजिंक्यतारा, सह्याद्री या कारखान्यांनीच संपूर्ण एफआरपी दिली आहे. मात्र, अन्य कारखान्यांनी एफआरपीबाबत काहीच सुतोवाच केलेले नाही. अनेक दिग्गज मानल्या जात असलेल्या कारखान्यांकडून तर आता पुढील टप्प्यात राहिलेल्या बिलाचे पाहू, असे आश्वासन देण्यात येत आहे. अर्थात यासाठी ते कारखानदार साखरेच्या घसरलेला दर आणि कोरोनाकडे बोट दाखवित आहेत. राज्यातील अगदी दुष्काळी भागातील काही कारखान्यांनी देखील गेल्या हंगामासाठी प्रतिटन उसाला एफआरपी तर दिली आहेच, शिवाय काहींनी त्यापेक्षा जादा रकमेचे बिल दिले आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या उलट अनुभव येतो आहे. बहुसंख्य साखर कारखानदारांनी कोरोना व लॉकडाऊनमुळे गत हंगामातील एफआरपी देता येत नसल्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, एफआरपी एकरकमी न मिळाल्याने त्याचा फटका शेतकर्‍याला बसू लागला आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ऊसदर नियंत्रण कायद्यानुसार साखर कारखान्याने गाळपासाठी शेतकर्‍याचा ऊस तोडून नेल्यानंतर 14 दिवसांच्या आत निश्‍चित केलेली एफआरपीची रक्कम संबंधित शेतकर्‍याला देणे बंधनकारक आहे. यासाठी कारखाने असमर्थ ठरले तर जिल्हा प्रशासनाने कारवाई करुन संपूर्ण एफआरपी वसूल करुन देण्याची तरतूद आहे. तसेच 14 दिवसानंतर दिलेल्या एफआरपी बरोबर त्या रकमेचे व्याज देण्याचे बंधन आहे. मात्र, बहुसंख्य कारखान्यांनी ही तरतूद ठोकरून लावली असल्याचे चित्र आहे.

तरी जिल्हा प्रशासनाने कारखान्यांना १० दिवसांत एफआरपीची रक्कम आदा करण्यात यावी, अन्यथा रयत क्रांती संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत हे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनात मधुकर जाधव, प्रकाश साबळे, प्रमोद जाधव, राजेंद्र काटे, विनोद काटे, विशाल सावंत, नंदकुमार सावंत, विक्रम जाधव, अजित सावंत व शेतक-यांनी सहभाग नोंदवला आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Kaygaon News : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अमळनेर येथे ‘आजी-आजोबा दिन’ उत्साहात साजरा

Velhe News : गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनाला शासनाची मान्यता; वाजेघर, वांगणी व शिवगंगा खोऱ्यातील सिंचनाला मिळणार गती

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

SCROLL FOR NEXT