सातारा

आमदारांचे 20 लाख, खासदारांच्या निधीतून 30 कोटींना कात्री; "कोरोना' उपाययोजनांसाठी वर्ग

उमेश बांबरे

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने खासदार व आमदारांचा निधी "कोविड'च्या उपाययोजनांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील तीन खासदारांचा मिळून दोन वर्षांचा 30 कोटींचा निधी त्यासाठी घेतल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात हा निधी कशासाठी खर्च केला याची माहिती मात्र, कोठेच उपलब्ध नाही. राज्य शासनाने आमदारांना प्रत्येकी एक कोटीचा निधी उपलब्ध केला होता. त्यानुसार जिल्ह्याला नऊ कोटी रुपये उपलब्ध झाले होते. त्यातून प्रत्येकी 20 लाखाप्रमाणे एक कोटी 80 लाख रुपयांचा निधी "कोरोना'साठी वापरण्यात आला आहे. उर्वरित प्रत्येकी 80 लाखांचा निधी विविध अपूर्ण विकासकामांवर खर्च केला जाणार आहे.
 
जिल्ह्यात तीन खासदार आहेत. त्यात दोन लोकसभेचे आणि एक राज्यसभेच्या खासदाराचा समावेश आहे. या वर्षी कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने खासदारांचा निधी कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आगामी दोन वर्षांचा खासदार निधी कोरोना उपाययोजनांसाठी केंद्राने गोठविला आहे. परिणामी यावर्षी जिल्ह्यातील तीन खासदारांना मिळणार प्रत्येकी पाच कोटीप्रमाणे एका वर्षाचा 15 कोटी रुपयांचा निधी गोठविला आहे. हा निधी केंद्राकडून "कोरोना'साठी होणाऱ्या उपाययोजनांवर खर्च केला जात आहे; पण प्रत्येक खासदारांना आपला निधी नेमका कुठे खर्च झाला याची माहिती उपलब्ध झालेली नाही. जिल्ह्यासाठी केंद्राकडून "कोरोना' उपाययोजनांसाठी निधी खर्च झाला असेलही; पण तो किती झाला याचीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे आणखी एक वर्ष तरी खासदारांना निधीविना काम करावे लागणार आहे.

SSR Case: मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी तब्बल दीड लाख फेक अकाऊंट
 
दुसरीकडे आमदारांचा 20 लाख रुपयांचा निधी "कोरोना'साठी खर्च करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील नऊ आमदारांना प्रत्येकी एक कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 20 लाख रुपये "कोरोना'साठी, तर उर्वरित 80 लाख रुपयांचा निधी अपूर्ण विकासकामे पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांवर त्याचा परिणाम दिसणार आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात रुग्ण सापडण्याचे व मृत्यूचे प्रमाण पूर्णपणे कमी झालेले नाही. त्यामुळे आणखी पाच ते सहा महिने "कोरोना'शी मुकाबला करावा लागणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा निधी आणखी वर्षभर तरी कोरोना उपाययोजनांसाठी खर्च होण्याची स्थिती आहे. 

संकटांना तोंड देत ताठ मानेनं उभं राहणं, हीच तर आयुष्यभराची सुगी!

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT