Ranjitsingh Naik- Nimbalkar
Ranjitsingh Naik- Nimbalkar esakal
सातारा

MIDC पळवण्याचा कट उधळून लावू; खासदार रणजितसिंहांचा इशारा

विशाल गुंजवटे

'..तोपर्यंत ही एमआयडीसी कोणीही पळवून नेऊ शकत नाही.'

बिजवडी (सातारा) : माण तालुक्यातील औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) Maan Taluka MIDC पळवून नेण्याचा कट कोण रचत असेल त्यांनी सावध राहावे. कारण, या मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) आहेत. जोपर्यंत आमदार गोरे व मी तुमच्या पाठीशी आहे. तोपर्यंत ही एमआयडीसी कोणीही पळवून नेऊ शकत नाही. त्यामुळे माणवासियांनो निश्चित राहा. आमदार गोरेंनी आजपर्यंत अनेक राजकीय कट हाणून पाडले. एमआयडीसी पळवून नेण्याचा कटही ते हाणून पाडतील, असा विश्‍वास खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर (Ranjitsingh Naik- Nimbalkar) यांनी व्यक्त केला.

दिवड येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि तालुक्यातील भाजपच्या (BJP) नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी आमदार जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, सभापती विलासराव देशमुख, रंजना जगदाळे, सरपंच जाकीर सय्यद, उपसरपंच किरण सावंत आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) जयकुमार गोरेंची पाणीप्रश्न आणि भागाच्या विकासाबाबतची तळमळ तन्मयतेने ऐकून घेत खटावला येण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. इथल्या रेल्वे सर्वेक्षणासाठीही आम्ही प्रयत्न करतोय, असेही श्री. निंबाळकर यांनी नमूद केले. आमदार गोरे म्हणाले, ‘‘माझ्या मतदारसंघातील पाण्याचा थेंब मी कोणाला पळवू दिला नाही. एमआयडीसी मंजूर करायला आम्ही प्रयत्न केलेत. त्यामुळे पळवापळवीची भाषा कोणी करू नये.

मतदारसंघात रेल्वे आणायचाही आमचा प्रयत्न सुरू आहे. मला पाणी आणायची, विकासकामे करायची मस्ती आहे. आता विरोधकांची पोकळ मस्ती उतरविण्याचा अजेंडा राबविणार आहे. पाण्याच्या टॅंकरची मागणी करणारी जनता आता ऊसतोडीसाठी टोळी मागताना दिसत आहे. हा बदल मी केलेल्या कामांची पोचपावती आहे. उरमोडीचे पाणी शेताच्या बांधापर्यंत देण्यासाठी १४३ कोटींची कामे सुरू आहेत. जिहे- कठापूरचे पाणी आणून पुन्हा एकदा फेटा बांधायची वेळ जवळ आली आहे.’’ वाळूवाल्यांनी जरा सबुरीने घ्यावे अन्यथा त्यांच्याकडेही बघावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. ॲड. हांगे, सदाशिव सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी नूतन सभापती, दिवडच्या सरपंचांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सयाजी लोखंडे यांनी प्रास्ताविक केले.

माझ्याकडे जनतेचे मिसाईल...

बारामती, फलटण, कऱ्हाड, साताऱ्यातून माझ्यावर राष्ट्रवादीकडून (NCP) मिसाईलचा मारा केला जातो; पण माझ्याकडे त्यांच्या सगळ्या मिसाईलला पुरून उरणारे माझ्यावर विश्वास असणाऱ्या जनतेचे हुकमी मिसाईल आहे. ‘माणच्या गोरेंनी मला माढ्यातून घालवून देशात माझी अब्रू घालवली. काहीही करून सगळे एकत्र या आणि त्यांना पाडा,’ असा आदेश पवार यांनी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत दिला होता. मतदारसंघातील २२ नेते कोट्यवधींना विकत घेण्यात आले होते. पवारांचा आदेश आणि मिळालेले पैसे घेऊन सगळी फौज माझ्याविरोधात लढली. पैशांचा पूर आणि जातीपातीचे राजकारण केले; पण जयकुमारने त्यांना हिसका दाखवला. मला पाडायची संधी हुकल्याने आता पुढील १५ वर्षे ‘त्यांनी’ आमदारकीची स्वप्नेच बघू नयेत, असा टोला आमदार गोरे यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT