MP Shriniwas Patil esakal
सातारा

कास पठारावर पार्किंगची व्यवस्था करा; खासदार पाटलांच्या सक्त सूचना

सकाळ डिजिटल टीम

सातारा : जागतिक पर्यटन स्थळ असणाऱ्या कास पठारावर (Kaas Plateau Season 2021) पर्यटनासाठी येणाऱ्या वयोवृद्ध, गरोदर स्त्रिया, लहान मुले यांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने पर्यटकांची वाहने व्यवस्थित पार्किंग करण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी सूचना खासदार श्रीनिवास पाटील (MP Shriniwas Patil) यांनी केली आहे.

वाहन चालविताना वाहनधारकांना मोबाईलवर संभाषण करण्यास मज्जाव करून प्रसंगी दंड आकारण्यात यावा.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक काल खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, साताऱ्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, मलकापूर नगरपंचायतीचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, अधीक्षक अभियंता मिन्हालीवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक अस्मिता पाटील, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी, ऑटोमोबाईल डीलर संघटनेचे सचिन शेळके उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाले, ‘‘शिंदेवाडी फाटा येथील पुलाचे कामकाज त्वरित सुरू करावे. महामार्गावरील गावांच्या नावाचे चुकीचे फलक दुरुस्त करावे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वेगमर्यादेचे फलक लावावे. वाहन चालविताना वाहनधारकांना मोबाईलवर संभाषण करण्यास मज्जाव करून प्रसंगी दंड आकारण्यात यावा. दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट सक्ती करण्यात यावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT