सातारा

कोल्हापूर, अहमदाबाद, बंगळूर सिटी एक्‍स्प्रेस गाड्यांना साताऱ्यात 'थांबा' आवश्यक : खासदार पाटील

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : रेल्वे कामासाठी केलेल्या जिल्ह्यातील भूसंपादनाबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. भूसंपादन रेकॉर्ड अद्ययावत करताना उपलब्ध असलेल्या नकाशांची खात्री राज्याच्या संबंधित महसूल विभागामार्फत करून भूसंपादनाच्या तक्रारींचा निपटारा करावा, अशी सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली. 

रेल्वेसंदर्भात झालेल्या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती नोंदवत खासदार पाटील यांनी जिल्ह्यातील काही ठळक मुद्दे मांडून विविध कामांची मागणी केली. अन्य खासदारांसह मुंबई, पुणे व सोलापूर येथील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक झाली. सातारा व कऱ्हाड रेल्वे स्थानकावर सुशोभीकरण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे कार्य देखावे व शिल्पचित्राच्या माध्यमांतून दाखवण्यात यावे. 

लोणंद येथे अंडरपास मंजूर करण्यासाठी प्रस्ताव करावा, लोणंद रेल्वे जंक्‍शनवर हायमास्ट लॅम्प बसवावे, जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा उपलब्ध व्हावी, अशा सूचना करून कोल्हापूर, अहमदाबाद आणि बंगळूर सिटी एक्‍स्प्रेस या प्रवासी गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्यातील काही स्टेशनवर थांबा मंजूर करण्याची मागणी खासदार पाटील यांनी या बैठकीत केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20I Squad for England Tour: सूर्याला डच्चू! अडीच वर्षांपासून बाहेर असलेला खेळाडू झाला कर्णधार; वैभव सूर्यवंशीचीही निवड

देशात खळबळ! मोठा पक्ष फुटणार? १६ खासदारांचे फोन बंद, २२ खासदार पक्ष फोडण्यास तयार; मुख्यमंत्री दिल्लीत तळ ठोकून

नवी मुंबईत विमानतळावर ८ महिन्यांत शिवरायांचा भव्य पुतळा, मुख्यमंत्री फडणवीसांनी केले अदानी लिमिडेटसह सिडकोचे अभिनंदन

Latest Marathi News Update: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, टी-२० संघाचं श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद

2026 मध्ये इंस्टाग्रामवर कोणत्या रील्स पाहातायत भारतीय लोक? समोर आला शॉक करणारा ट्रेंड

SCROLL FOR NEXT