MP Srinivas Patil sakal
सातारा

Sharad Pawar : श्रीकृष्णासारखे जागेवर बसुन मार्दर्शन केले तरही कलाटणी घडवण्याची ताकद; खासदार श्रीनिवास पाटील

महाभारतात श्री कृष्णाने मी शस्त्र हातात घेणार नाही, असा पण केला होता

हेमंत पवार

कऱ्हाड : जेष्ठ नेते शरद पवार साहेबांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माध्यमातून समजली. ती धक्कादायक आहे. महाभारतात श्री कृष्णाने मी शस्त्र हातात घेणार नाही, असा पण केला होता. मात्र जागेवर बसून मार्गदर्शन केले तरी सुध्दा युध्दात चमत्कार घडवून आणला होता. पवार साहेब असेच आमचे उत्तुंग नेते आहेत. नुसते जागेवर बसून व मार्गदर्शन करूनही कलाटणी घडवण्याची ताकद त्यांच्यामधे आहे.

त्यामुळे ते जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असू, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज मुंबई येथे झालं. त्यावेळी पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला.

त्यावर प्रतिक्रीया देताना खासदार पाटील म्हणाले, शरद पवार आणि मी 1958 पासून युवक कॉंग्रेसमधून सुरूवात केली. त्यांनी सलग 65 वर्षे केलेली समाजसेवा, त्यातील 55 वर्ष लोकप्रतिनिधित्व केल्यानंतर आता पुढच्या पिढीसाठी काहीतरी करण्याचा साहेबांची इच्छा दिसतेय. त्यामुळे ते सांगतील ते धोरण आणि जे बांधतील ते तोरण हिच आमच्या सारखा कार्यकर्त्याची भूमिका राहिल. फक्त ते पदावर राहणार नाहीत असे दिसून येत आहे.

शरद पवार यांचे नेतृत्व केवळ पद आणि निवडणुका पुरते मर्यादित नसून ते व्यापक व्यक्तिमत्व आहेत. पुढच्या पिढीला काहीतरी भरीव देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, जबाबदारी असलेल्‍या संस्थांना अधिक प्रभावी करण्यासाठी ते जास्त वेळ देणार आहेत असे दिसते. याचा अर्थ ते पूर्णपणे निवृत होतायतं असे नाही.

कुठतरी राजकारणा पलीकडे जाऊन काम करण्याचा साहेबांचा निर्णय दिसतोय. त्यामुळे आम्ही सर्व त्यांचे मार्गदर्शन घेत राहू. महाभारतात श्री कृष्णाने मी शस्त्र हातात घेणार नाही असा पण केला होता. मात्र जागेवर बसून मार्गदर्शन केले तरी सुध्दा युध्दात चमत्कार घडवून आणला होता. पवार साहेब असेच आमचे उत्तुंग नेते आहेत. नुसते जागेवर बसून व मार्गदर्शन करूनही कलाटणी घडवण्याची ताकद त्यांच्यामधे आहे. मात्र त्यांनी अचानकपणे घेतलेल्या निर्णयासंदर्भात त्यांच्याशी भेटून चर्चा केल्यानंतरच अधिक सांगता येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Research Funding: पुणे-मुंबईसह देशातील संशोधकांना मोठी संधी; युरोपचे ९३.५ अब्ज युरोचे दार उघडणार!

Political Storm in Kolhapur : "हा मोर्चा गोकुळसाठी नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदासाठी"; उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुश्रीफांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Kapil Sharma Show : "लाल मंच्युरियन पिले पड गये..."; महाराष्ट्राचे 'डॅशिंग' IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर सुनील ग्रोव्हरची भन्नाट कविता, VIDEO तुफान व्हायरल!

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

Climate Summit: जगाची चिंता वाढली! युद्ध आणि AIमुळे हवामान बदलाचे आव्हान झाले आणखी अवघड

SCROLL FOR NEXT