सातारा

खासदार पाटलांचा रांगडा अंदाज, चक्क शेतात उतरुन केली भातकापणी

Balkrishna Madhale

सातारा : कोणी कितीही मोठा झाला तरी, त्याची मातीशी घट्ट नाळ जुळलेली असते. आज बरेच अभिनेते, मंत्री आपल्या शेतात घाम गाळताना दिसत आहेत. मध्यंतरी अभिनेता सलमान खान, सैफअल्ली खान यांनी आपल्या शिवारात घाम गाळत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्याची सोशल मीडियावर खूप चर्चाही झाली. म्हणेजच विविध क्षेत्रात मोठ्या अभिनयान भुरळ घालणा-या प्रेक्षकांना या अभिनेत्यांचा हा रियल लूक खूप भावला होता.   

मातीशी जुळलेले घट्ट नातं मातीपासून कधीच वेगळं करु शकत नाही. सध्या साताऱ्यात त्याचाच प्रत्येय बघायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी चक्क शेतात उतरुन भातकापणी केली. श्रीनिवास पाटील हे तेच खासदार आहेत ज्यांनी साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. श्रीनिवास पाटलांसाठी शरद पवारांनी साता-यात घेतलेली सभा निर्णायक ठरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे एवढे मोठे नेते शेतात सहकुटुंब भातकापणी करत असल्याची बातमी सध्या संपूर्ण साताऱ्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

पाटील यांनी पत्नीसह त्यांचा उच्च शिक्षित मुलगा सारंग पाटील, सून, नातवंडे आणि काही शेतमजूर यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष भातकापणीला प्रारंभी केला. प्रथम नारळ फोडून त्यांनी शेताचे पूजन केले. शेतीमध्ये असणारी आवड आणि आपल्या मातीशी जुळलेले बंध ही परंपरा पुढील पिढीमध्येसुद्धा कायम राहावी, या उद्देशाने सहपरिवार शेतीचं काम करत असल्यास त्यांनी सांगितलं. सध्या खरीप हंगामातील पिकांच्या काढणीच्या कामांना सर्वत्र गती आली आहे. आम्ही देखील सर्व कुटुंबीय मिळून आमच्या शेतातील भात काढणीला सुरुवात केली असून, राजकीय क्षेत्रात काम करत असताना शेतीसाठी वेळ फारच कमी मिळतो. नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सतत सुरू असतात. तरी देखील मी मूळचा शेतकरी असल्याने आम्ही शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असतो, अशी माहिती श्रीनिवास पाटील यांनी दिली. पाटील यांनी याबाबतचे फोटो सोशल माध्यमांवरती शेअर करताच अनेकांनी भन्नाट कमेंट देता, त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

Plastic Waste Drive: उरुळी कांचनमध्ये ‘माझे प्लास्टिक – माझी जबाबदारी’ संकल्पनेतून प्लास्टिक बँक; १ किलो प्लास्टिकच्या बदल्यात महिलांना साखर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

IND vs AFG, ODI: रोहित शर्मा रनआऊट झाल्यानंतर नक्की काय म्हणाला? शुभमन गिलनेच केला खुलासा

Illegal Pistol Seized: इंदापूरमध्ये अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT