Udayanraje Bhosale vs Sharad Pawar esakal
सातारा

MP Udayanraje Bhosale : शरद पवारांचा पक्ष साडेतीन जिल्ह्यापुरताच मर्यादित; खासदार उदयनराजेंची टिका

एकेकाळी स्वतःचा राष्ट्रीय म्हणुन रजिस्टर केलेला पक्ष प्रादेशिक पक्ष राहिला. आज त्यांचा पक्ष प्रादेशिक पक्षही राहिला नसुन तो साडेतीन जिल्ह्यापुरताच मर्यादित राहिलेला पक्ष आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड - शरद पवार यांच्या चार सभा घेतल्याचे मला सांगण्यात आले. माझ्यावर त्यांचे प्रेम आहे. त्यांनी चार नाही ४० सभा घ्याव्या. कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेशात काय होत नाही. मग काय तर पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही सातारा, माढा मतदार संघात त्यांच्या सभा होत आहेत.

एकेकाळी स्वतःचा राष्ट्रीय म्हणुन रजिस्टर केलेला पक्ष प्रादेशिक पक्ष राहिला. आज त्यांचा पक्ष प्रादेशिक पक्षही राहिला नसुन तो साडेतीन जिल्ह्यापुरताच मर्यादित राहिलेला पक्ष आहे. हा आम्ही केलेला रडीचा डाव नाही. याला कर्मच म्हणतात, अशी उपरोधीक टिका खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली.

सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार म्हणुन त्यांनी आज साकुर्डी (ता. कऱ्हाड) येथे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासमवेत प्रचार सभा घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

निवडणुक हातातुन गेल्यामुळे कार्यकर्त्यांना दम देवुन रडीचा डाव खेळला जात आहे. असे काही घडले तर रस्त्यावर उतरु या महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नावर खासदार भोसले म्हणाले, याला दम देणे नाही तर त्याला कर्म म्हणतात. जे पाप करतो ते याच जन्मी फेडावे लागते. हे आत्ता झालेले नाही. ते जामिनावर आहेत.

ते न्यायालयात गेले. कोणता गैरव्यवहार केला नसता तर न्यायालयात जायचे कारण काय? उच्च न्यायालयाने तुमचे नाव यात दिसुन येत आहे. त्यामुळे आम्ही जामीन देवु शकत नाही असे सांगीतले आहे. आमदार महेश शिंदे यांनी या प्रकरणाची सही शिक्यासह कागदपत्रांची माहिती पत्रकारांसमोर दिली आहे. आम्ही रडीचा डाव खेळत नाही तर तुम्ही लोकांना रडवण्याचा डाव केला. लाज वाटायला पाहिजे.

मुंबई बाजार समितीत घोटाळे केले असतील अशा लोकांच्या हातात नेतृत्व दिले तर जिल्ह्याची काय अवस्था होईल. तुम्ही यशवंत विचार सांगता. मग यशवंतराव चव्हाण यांचे असे विचार होते ? त्यांचा लोक कल्याणाचा विचार होता. सातारा लोकसभा मतदार संघातील १८ लाख मतदारात एकही चारीत्र्यसंपन्न व्यक्ती तुम्हाला मिळाला नाही. माझ्या मतदार संघात शरद पवार यांच्या चार सभा घेतल्या आहेत, असे मला सांगण्यात आले.

माझ्यावर त्यांचे प्रेम आहे. चार नाही ४० सभा घ्याव्या. कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेशात काय होत नाही. मग काय तर पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही सातारा, माढा मतदार संघात त्यांच्या सभा होत आहे. एकेकाळी स्वतःला नॅशनल पार्टी म्हणुन त्यांनी रजिस्टर केले होते.

प्रादेशिक पक्ष म्हणुन त्यांच्या पक्षाची आज ओळख आहे. आज त्यांचा पक्ष प्रादेशिक पक्षही राहिलेला नाही. साडेतीन जिल्ह्यातच मर्यादेत राहिलेला त्यांचा पक्ष आहे. हा आम्ही केलेला रडीचा डाव नाही. याला कर्म म्हणतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार, तरी पाण्याची चिंता कायम! ७ धरणांच्या साठ्यात फक्त ३ टक्के वाढ, आकडेवारी समोर

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Marathi Live Updates : पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी झेप; अवघ्या एका दिवसात तब्बल ३.७८ टक्क्यांनी वाढ

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

Tukaram Mundhe: त्वचा उजळवणाऱ्या क्रीम धोकादायक; FDA ने 3 लोकप्रिय ब्रँडवर घातली बंदी, सौंदर्यप्रसाधनांचा धक्कादायक अहवाल

SCROLL FOR NEXT