Udayanraje Bhosale vs ShivendraRaje Bhosle  esakal
सातारा

दोन्ही डगरीवर हात ठेवणारा आमदार आता सैरभैर झालाय; उदयनराजेंचा भावावर तिखट वार

'कुरतडलेली दाढी आणि भुरसट मिशांना पीळ देण्यापेक्षा प्रेमानं कोणाला आलिंगण देणं केव्हाही चांगलं.'

सकाळ डिजिटल टीम

'कुरतडलेली दाढी आणि भुरसट मिशांना पीळ देण्यापेक्षा प्रेमानं कोणाला आलिंगण देणं केव्हाही चांगलं.'

Satara News : साताऱ्यातील दोन्ही राजेंमधील वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. दररोज एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता या वादात आणखी ठिणगी पडलीय. ज्यांना जनतेनं मनापासून आणि कायमस्वरुपी पालिकेतून रिटायर्ड केलं, त्यांनी सातारा विकास आघाडीनं आता रिटायर्डमेंट घ्यावी, असा सल्ला देणं म्हणजे चोंबडेपणा आहे, असा टोला खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लगावला.

उदयनराजे म्हणाले, प्रशासकीय राजवट लागून आता जवळपास एक वर्ष होत आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी साविआ काहीच करीत नाही अशी बोंब मारणारेच ज्यावेळी कासचं जलपूजन केलं, त्यावेळी साविआचा संबंध काय अशी गरळ ओकत होते. नथीतून तीर मारण्याचा त्यांचा प्रकार जुनाच आहे. दोन्ही डगरीवर हात ठेवणारा आमदार आता सैरभैर झालाय. त्यांना जनतेमधून थारा मिळणार नाही याची भीती वाटत असल्यानं ते आमच्यावर टीका करत आहेत.

कुरतडलेली दाढी आणि भुरसट मिशांना पीळ देण्यापेक्षा प्रेमानं कोणाला आलिंगण देणं केव्हाही चांगलं. त्यांच्यासारखं निदान आमच्या पोटात एक आणि ओठात एक असं तरी नाही, असा पलटवार उदयनराजेंनी मिठ्या मारणं, पप्प्या घेणं या शिवेंद्रसिंहराजेंच्या टीकेवर केलाय. आम्ही हत्तीच्या चालीनं चाललो आहोत. भुंकणाऱ्यांकडं आम्ही लक्ष देत नाही, असंही त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना फटकारलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT