Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale esakal
सातारा

वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे; उदयनराजेंचा अजित पवारांवर संताप

सकाळ डिजिटल टीम

सातारा एसटी स्टॅण्डनजीक उभारलेल्या क्रीडा संकुलबाबत आज उदयनराजेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

सातारा : क्रीडा संकुलावरून (Satara Sports Complex) आज भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) प्रचंड संतप्त झाल्याचे पहायला मिळाले. साताऱ्यातील स्टेडियमचं वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे, असा संताप उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. उदयनराजेंचा हा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दिशेने असल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय. साताऱ्यातील जागा नेते, पुढारी लोक हडपत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सातारा एसटी स्टॅण्डनजीक उभारलेल्या क्रीडा संकुलबाबत आज उदयनराजेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली. उदयनराजे म्हणाले, संकुल चुकीच्या पद्धतीनं उभं करण्यात आलंय. आधी रणजी ट्रॉफी शाहू स्टेडियमवर भरवल्या जात होत्या. आता साधी रणजी ट्रॉफीची मॅच देखील जिंकू शकत नाही, अॅथेलेटिक्स जिंकत नाही, नेमकं काय चाललंय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सातारा प्राईम एरिया आहे. एवढं असताना संकुल उभारलं गेलं नाही. बी. जी. शिर्केंनी बालेवाडीचं स्टेडियम कॉमन वेल्थसाठी बांधलं होतं. त्यांनी आपल्या संकुलासाठी निघालेल्या टेंडरसाठी फॉर्म भरला होता. हे का सांगतोय, कारण हे मीडियात आलं पाहिजे म्हणून.. हे आमदार, खासदार जी सो कॉल्ड माकडं आहेत, या सगळ्यांनी त्यातून बोध घ्यायला हवा. राजकारणापलिकडे जाऊन विचार करायला पाहिजे. स्पोर्ट्स आणि इतर ठिकाणी राजकारण आणू नये. जे स्टेडियमचं वाट्टोळं करत आहेत, त्यांना मुस्काडलं पाहिजे, असा संतापही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT