Udayanraje Bhosale esakal
सातारा

'लय मस्ती आलीया वाटतं; सभासदांची नव्हे, माझी जिरवून दाखवा'

उमेश बांबरे

खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे ईडीच्या नोटिसीची माहिती मागितली होती.

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेनं (Satara Bank) जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटपप्रकरणी जिल्हा बँकेला ईडीची नोटीस (Ed notice) आलीय. या नोटिसी संदर्भात खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी बँकेकडे माहिती मागितली असता, बँकेच्या संचालकांनी ही माहिती देण्यास नकार दिला. यानंतर उदयनराजे चांगलेच संतापल्याचे पहायला मिळाले. त्यांनी हात जोडून विनंती करत, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा, असं आवाहन त्यांनी केलंय.

जरंडेश्वर कारखान्याला (Jarandeshwar Factory) जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची आणि ईडीच्या (ED) चौकशीची लेखी माहिती जिल्हा बँकेचे संचालक खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे (Satara Bank) मागितली होती. मात्र, हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत संचालक मंडळाने ही माहिती देण्यास नकार दिला होता. बँकेच्या संचालक मंडळाकडून देण्यात आलेल्या या उत्तरानंतर आज खासदार उदयनराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

उदयनराजे म्हणाले, बँक टिकून रहावी असं मला वाटत आहे. मला माहिती आहे की, मी बोलत असताना अनेकांना वाटत असेल की खूप मस्ती आलीय. माझी नका जिरवू, मेहरबानी करा... माझी विनंतीय. मी तुमचा कोणाचा दुश्मन नाहीये. हात जोडून विनंती करतो... ही बँक शेतकरी आणि शेतकरी सभासदांची आहे. या गोरगरीब शेतकरी सभासदांच्या वतीने विनंती करतो ही बँक राहू द्या. ही बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा, असं आवाहन त्यांनी दिलंय. ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठं जायचं... परिणामांना मी घाबरत नाही, जे व्हायचंय ते होऊ द्या, असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीला दिलाय. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. मी शेतकऱ्यांच्या हिताचं बोलतोय, असंही उदयनराजेंनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT