सातारा

प्रतिकारशक्‍ती वाढवून कोरोनावर मात करणे हाच पर्याय : उदयनराजे

उमेश बांबरे

सातारा : कोरोना बाधित होऊन बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान केल्याने अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यामुळे प्लाझ्मा दान करणाऱ्या दात्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. 

गोलू साळुंखे व मित्र समूहाच्या वतीने प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्‍तींचा सत्कार जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी सुनील काटकर, शिरीष चिटणीस, वाई मिशन हॉस्पिटलचे रॉबर्ट मोझेस, जितेंद्र खानविलकर, गोलु साळुंखे, मंदार जाधव, गौरव इमडे, अमोल पाटुकले उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, "कोरोनावर लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य राखून प्रतिकारशक्‍ती वाढवून कोरोनावर मात करणे हाच पर्याय आहे. जे कोरोना बाधित होऊन बरे झालेले आहेत, त्यांच्या प्लाझ्माचा वापर करुन कोरोना रुग्णांवर चांगले उपचार करता येत आहेत. त्यामुळे प्लाझ्मा दान केल्याने अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या वेळी बारामती, कऱ्हाड, वाठार, पळशी, खटाव, मायणी, केंजळ, सातारा शहर आदी ठिकाणच्या 32 प्लाझ्मा दात्यांचा सत्कार करण्यात आला. गोलू साळुंखे यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT