Udayanraje Bhosale esakal
सातारा

देश प्रगतीपथावर असताना पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही : उदयनराजे

बाळकृष्ण मधाळे

सातारा : आपला देश प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही, प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरण विषयक सजग राहिल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू शकू, असं मत खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी जागतिक पर्यावरण दिनी व्यक्त केलंय. दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ (World Environment Day) म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, हा यामागचा मुख्य उद्देश. (MP Udayanraje Bhosale Has Expressed His Views On The Occasion Of World Environment Day)

आपला भारत देश विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. मात्र, असे असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही.

आपला भारत देश विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. मात्र, असे असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो, हे आपण त्सुनामी, नरगिससारखी सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवलं आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरणाचा समतोल राखल्यास आपण खर्‍या अर्थानं समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Environment

आज जगभरात मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे, त्यामुळे सजीवसृष्टी धोक्यात आली आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरणाची विशेष काळजी घेतल्यास, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास नक्कीच थांबेल. तसेच आपल्या परिसरात झाडे देखील लावणे गरजेचे आहे, जेणे करुन आपल्याला चांगला ऑक्सिजन मिळेल.

MP Udayanraje Bhosale Has Expressed His Views On The Occasion Of World Environment Day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT