Udayanraje Bhosale esakal
सातारा

साताऱ्या‍सह हद्दवाढ भागात लसीकरण केंद्र मंजूर; खासदार उदयनराजेंची माहिती

गिरीश चव्हाण

सातारा : शहरासह हद्दवाढीमुळे पालिकेत आलेल्‍या भागातील नागरिकांच्‍या सोयीसाठी विविध भागात नऊ लसीकरण केंद्रे (Corona Vaccination Center) मंजूर झाल्‍याची माहिती खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी पत्रकाव्‍दारे दिली आहे. या नवीन केंद्रांमुळे पालिकेच्‍या कस्‍तुरबा रुग्‍णालय (Kasturba Hospital) आणि गोडोली येथील लसीकरण केंद्रांवर येणारा ताण कमी होणार असल्‍याचा विश्‍‍वासही त्‍यांनी पत्रकात नमूद केला आहे. (MP Udayanraje Bhosale Informed That 9 Vaccination Centers Have Been Sanctioned For Satara)

कोरोना प्रतिबंधक लसीचे वितरण केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शन सूचनांनुसार सध्‍या सर्वत्र लसीकरण सुरू आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीचे वितरण केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शन सूचनांनुसार सध्‍या सर्वत्र लसीकरण सुरू आहे. या क्रियेस गती येण्‍यासाठी तसेच साताऱ्याच्‍या विविध भागात राहणाऱ्या नागरिकांना त्‍यांच्‍या घराजवळ लस मिळावी, यासाठी वाढीव केंद्रे मंजूर करण्‍याची मागणी खासदार उदयनराजेंनी आरोग्‍य विभागाकडे केली होती.

त्यानुसार करंजे येथील श्रीपतराव पाटील विद्यालय, दौलतनगर येथील शानभाग विद्यालय, शाहूपुरी ग्रामपंचायत कार्यालय (Shahupuri Gram Panchayat Office) इमारत, शाहूनगरमधील विशाल सह्याद्री विद्यालय, विलासपूर ग्रामपंचायत कार्यालय इमारत, चंदनगर येथील अंगणवाडी इमारत, विक्रांतनगर, खिंडवाडी तसेच पिरवाडी येथील जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत ही केंद्रे सुरू करण्‍यात येत आहेत. या केंद्रांसाठीचा कर्मचारी वर्ग शासनाने मंजूर केला असून नागरिकांना लसीसाठी इतरत्र करावी लागणारी धावाधाव थांबणार आहे. या केंद्रांवर जावून नागरिकांना शासनाने दिलेल्‍या नियमांचे पालन करत लस घेण्‍याचे आवाहनही उदयनराजे यांनी पत्रकात केले आहे.

MP Udayanraje Bhosale Informed That 9 Vaccination Centers Have Been Sanctioned For Satara

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT