Udayanraje Bhosale esakal
सातारा

आम्हीच काय, मुश्रीफांना कोणीही भेटू शकतो

बाळकृष्ण मधाळे

सातारा : सध्या खासदार उदयनराजे जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. कालच त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांची भेट घेतली व आज त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजेंचा (MP Udayanraje Bhosale) महाविकास आघाडीतील नेत्यांशी संपर्क वाढत असल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. मात्र, या चर्चांना उदयनराजेंनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. (MP Udayanraje Bhosale Met On Minister Hasan Mushrif Satara Marathi News)

सध्या खासदार उदयनराजे जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे.

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत. त्यांच्या कामाची एक वेगळीच शैली असून त्यांना आम्हीच काय कोणीही कधीही भेटू शकतो आणि त्यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळेच त्यांना भेटलो असल्याचे खासदार उदयनराजेंनी या भेटीदरम्यान स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, सातारा नगरपरिषदेची (Satara Municipal Council) सुमारे ७ महिन्यांपूर्वी हद्दवाढ झाली. हद्दवाढ होण्यापूर्वीच्या हद्दीबाहेरील ग्रामीण नागरी क्षेत्राकरिता लोकसंख्येनुसार १५ या वित्त आयोगाची रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेली आहे. सदरची सुमारे २ कोटी ९२ लाख ६७ हजार १७० रुपयांची रक्कम हद्दवाढ झाली असल्याकारणाने, त्या भागाच्या विकासाकरिता सातारा नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी एका निवेदनाव्दारे समक्ष भेटून केली.

उदयनराजे म्हणाले, सन २०२०-२१ करिता शासन निर्णयानुसार बंधित निधीच्या पहिला हप्त्याच्या वितरणापोटी ग्रामपंचायत (Gram Panchayat), पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर अनुक्रमे १०:१०:८० टक्के या प्रमाणात निधी वितरीत करण्यात आलेला आहे. दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजी सातारा नगरपरिषदेची हद्दवाढ करण्यात आलेली आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या भागाचा १५ व्या वित्त आयोगाचा निधी सक्षम प्राधिकरण म्हणून सातारा नगरपरिषदेकडे वाढीव भागाच्या विकासाकरिता वर्ग करणे आवश्यक आहे. सध्या परिषदेकडे सदरचा निधी अखर्चित आहे. सदरचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत परिषदेकडे सूचना केली असता, आपल्या खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तरी, सदरचा निधी सातारा नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत आपण जिल्हा परिषदेस योग्य त्या सूचना निर्गमित कराव्यात, अशी शिफारस त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे.

MP Udayanraje Bhosale Met On Minister Hasan Mushrif Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cat Treatment Dispute : मांजरीच्या औषधावरून नागपुरात राडा! क्लिनिकमध्ये घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; डॉक्टरलाही दिली जीवे मारण्याची धमकी, नक्की काय घडलं?

Latest Marathi News Live Update : रांजणगाव गणपतीत दिवसाढवळ्या मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न; महिलेच्या धाडसाने डाव फसला

Mumbai News: हे तर गुप्तचर यंत्रणेचं अपयश! नौदलाच्या तळाजवळ इमारत बांधलीच कशी? हायकोर्टानं पुन्हा फटकारलं

Nagpur Fraud News : मंत्र्यांच्या पीएसोबत ओळख असल्याचे सांगत फसवणूक; ७ लाखांनी गंडविले, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

बिग बॉस मराठी फेम दीपाली सय्यदच्या कुटूंबातील सदस्याचं निधन ; "आम्ही तिला अजून सांगितलं नाही.." नवऱ्याचा खुलासा

SCROLL FOR NEXT